नवी दिल्ली : पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल (Ethanol) मिसळल्यास दरवर्षी देशाला सुमारे 1 लाख कोटी रुपयांचा अर्थिक फायदा होईल. तसेच विदेशी एक्सचेंजमध्ये (Forex Exchange) बचत होण्यास मदत होईल, अशी माहिती पेट्रोलियम सचिव तरुण कपूर यांनी दिली.
ते रेपोस एनर्जी आणि टाटा मोटर्सच्यावतीने आयोजित एका समारंभात बोलत होते. सध्या देशभरात विक्री होणाऱ्या पेट्रोलमध्ये केवळ 5 टक्के इथेनॉल (Ethanol) मिसळले जाते. या जैवइंधनाची (Bio Fuel) निर्मिती अनेक घटकांपासून केली जाते.
यावेळी कपूर म्हणाले, की आमच्या आकडेवारीनुसार पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळल्याने आणि 5000 कम्प्रेस्ड बायोगॅस प्लांटस उभारल्याने देशाला दरवर्षी 1 लाख कोटींचा फायदा होईल.
नवीन काळातील ऊर्जेवर विश्वास
जगभरातील अनेक देश जीवाश्म इंधनावर आधारित नव्या ऊर्जास्त्रोतांवर (Energy Sources) भर देताना दिसत आहेत. भारतातही या अनुषंगाने बदलाचे एक नवे पर्व सुरु झाले आहे. असे असले तरीही देशात ऊर्जेची मोठी गरज आहे. आपण कोळश्यापासून इंधन आणि गॅसकडे वाटचाल करीत आहोत. जर भारताला अक्षय ऊर्जा आणि गॅसकडे वाटचाल करायची असेल तर आपल्याला देशातंर्गत कशाचे उत्पादन घेता येईल ते पाहावे लागेल, असंही कपूर यांनी सांगितले.
महानगरांमध्ये इंधन दरात मुंबई पहिल्या क्रमांकावर!
जैवइंधनाचे आहेत अनेक फायदे
या बदलत्या काळात जैवइंधनाचा (Bio Fuel) वापर वाढवल्यास विदेशी एक्सचेंजमध्ये मोठी बचत होऊ शकते, तसंच मोठ्या प्रमाणात उद्योग उभारणी आणि रोजगाराची संख्या वाढू शकते. त्याचप्रमाणे आपण जैवइंधनावर आधारित अर्थव्यवस्था उभारु शकतो. त्यामुळे या संधीचा स्टार्टअप्सने (Startups) फायदा घ्यावा, असे आवाहन कपूर यांनी केले आहे.
उत्पादनाच्या अनुषंगाने पाहिले तर स्टार्टअप्ससाठी ही मोठी संधी आहे.
OMG! छातीवर कान, हात ठेवण्याची नाही गरज; डोळ्यांनीच दिसतं मुलीचं धडधडतं हृदय
कपूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, तेल आणि गॅस क्षेत्रातील सरकारी कंपन्या केवळ कॅपेक्सच्या नावावर दीड लाख कोटी रुपये खर्च करतात. तसेच उपकरणे देखील मोठ्या प्रमाणावर आयात करावी लागतात. याला जर खासगी क्षेत्रातील कॅपेक्सची जोड दिली तर ही रक्कम वर्षाला 2 लाख कोटीपर्यंत पोहोचते. त्यावर नियंत्रण ठेवत नवीन संधी निर्माण करता येतील. यावेळी कपूर यांनी भाषणात केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया (Make in India) अभियानावर विशेष जोर दिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.