Home /News /money /

डिसेंबर महिन्यात उच्चांकी GST कलेक्शन! रक्कम 1.15 लाख कोटींपेक्षा जास्त

डिसेंबर महिन्यात उच्चांकी GST कलेक्शन! रक्कम 1.15 लाख कोटींपेक्षा जास्त

देशाची अर्थव्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे. दरम्यान GST व्यवस्था लागू झाल्यानंतर आतापर्यंतच्या कलेक्शनमध्ये डिसेंबर (December 2020) मधील कलेक्शन सर्वाधिक आहे.

    नवी दिल्ली, 01 जानेवारी: मागील वर्षातील डिसेंबर महिन्यात (December 2020) सर्वाधिक जीएसटी कलेक्शन झाले आहे. याबाबत माहिती देताना अर्थ मंत्रालयाने (Ministry of Finance) शुक्रवारी सांगितले की डिसेंबर 2020 मध्ये जीएसटी संकलन (GST Collection) 1,15,174 कोटी रुपये होते. जीएसटी कायद्याच्या अंमलबजावणीनंतर एखाद्या महिन्यातील हा सर्वात मोठा जीएसटी संग्रह आहे. 2019 च्या डिसेंबर महिन्याच्या तुलनेत हे प्रमाण 12 टक्क्यांनी अधिक आहे. मंत्रालयाने सांगितले की, गेल्या काही महिन्यांपासून जीएसटी संकलनाच्या आकडेवारीत सातत्याने वसुली होत आहे. चालू आर्थिक वर्षात सलग तिसरा महिना आहे, जेव्हा जीएसटी संकलन 1 लाख कोटींच्या पुढे गेले आहे. या आधीच्या महिन्यात म्हणजेच नोव्हेंबर 2020 मध्ये एकूण जीएसटी कलेक्शन 1,04,963 कोटी रुपये होते. मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'जीएसटी लागू झाल्यानंतर डिसेंबर 2020 मधील जीएसटी संग्रह सर्वात जास्त आहे. जीएसटी संकलनात प्रथमच 1.15 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. एप्रिल 2019 मध्ये आतापर्यंतचे सर्वाधिक जीएसटी कलेक्शन झाले हकते, जे की 1,13,866 कोटी रुपये होते. साधारणपणे एप्रिल महिन्यात जीएसटीचा महसूल जास्त असतो. मार्च हा आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना आहे, त्यामुळे एप्रिलमध्ये जीएसटीचा महसूल जास्त असतो'. (हे वाचा- TV, फ्रीज घ्यायचा विचार करत असाल तर आधी हे वाचा; होम अप्लायन्सेस होणार महाग) मंत्रालयाने जीएसटी संकलनात या विक्रमी वाढीमागील कारण सांगितले आहे की, महामारीनंतरची आर्थिक रिकव्हरी आणि राष्ट्रीय पातळीवर जीएसटी पायरेसीविरूद्ध मोहिमेमुळे हे शक्य झाले आहे. नुकतीच जीएसटी चोरी आणि बनावट बिलांचा वापर रोखण्यासाठी अनेक बदल करण्यात आले, त्यानंतर जीएसटी अनुपालन (GST Compliance) सुधारले आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: GST, Money

    पुढील बातम्या