Home /News /money /

1 लाख 80 हजार रुपयांत सुरू करा हा व्यवसाय; सरकारकडून मिळेल सबसिडी

1 लाख 80 हजार रुपयांत सुरू करा हा व्यवसाय; सरकारकडून मिळेल सबसिडी

कोरोना काळात नोकरी गेल्याने आज बरेच जण व्यवसायाकडे वळले आहेत. या संकटकाळात व्यवसाय करताना कमीत कमी भांडवलात जास्त नफा देणारे व्यवसाय कोणते, कोणत्या गोष्टीची मागणी आहे याचा देखील विचार करणे गरजेचे आहे.

नवी दिल्ली, 30 जानेवारी : कोरोना (Covid 19) काळात नोकरी गेल्याने आज बरेच जण व्यवसायाकडे वळले आहेत. कमीत कमी भांडवलात जास्त नफा देणारे व्यवसाय (Business) लोक करत आहेत. या संकटकाळात व्यवसाय करताना कोणत्या गोष्टीची मागणी आहे याचा देखील विचार करणे गरजेचे आहे. माशांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. याचबरोबर माशांचे आरोग्यदायी फायदे असल्याने यांची मागणी कधीही कमी होत नाही. या व्यवसायातून तुम्ही वर्षभर नफा मिळवू शकता. या व्यवसायासाठी सरकार देखील मदत करत असून अतिशय कमी भांडवलात हा व्यवसाय सुरु करू शकता. नाबार्ड यासाठी शेतकऱ्यांना 20 टक्के सबसिडी देत असून शेतीपूरक व्यवसाय म्हणून ट्राउट मस्त्यपालन (Trout Fish Farming) हा व्यवसाय खूप फायदेशीर ठरू शकतो. केवळ 2 लाख 30 हजार रुपयांची गुंतवणूक करून हा व्यवसाय तुम्ही करू शकता. यामध्ये 20 टक्के सबसिडी मिळाल्यास तुम्हाला 1 लाख 80 हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. मत्यपालनाला (Fish Farming) प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने दोन नवीन विधेयक आणली आहेत. शेतकऱ्यांनी शेतीबरोबरच या व्यवसायावर देखील भर दिल्यास त्यांना मोठा फायदा मिळू शकतो. उत्पन्नामध्ये पाचपट वाढ होऊ शकतो. देशभरात 11 लाख हेक्टरवर मत्स्यपालन करता येणार आहे. यामध्ये खारे पाणी असणाऱ्या राज्यांमध्ये झिंगाची शेती मोठ्या प्रमाणात होऊ शकते. यामध्ये 19509 किलोमीटर लांब नद्यांमध्ये हे मत्स्यपालन होऊ शकते. सध्या देशभरातील 25 लाख हेक्टर क्षेत्रातील तलाव, जलाशय आणि पाण्याच्या अनेक स्त्रोतांमध्ये सध्या प्रतिहेक्टरी तीन टन उत्पादन होत आहे. भविष्यात हे उत्पादन आणखी वाढवण्याची योजना आहे.

हे वाचा - नोकरीपेक्षा अधिक फायद्याचा ठरेल हा व्यवसाय, वर्षाला होईल लाखोंची कमाई

ट्राउट फार्मिंग म्हणजे काय - नाबार्डच्या मते, ट्राउट हा एक प्रकारचा मासा असून स्वच्छ पाण्यामध्ये याची पैदास होते. हिमाचल प्रदेश, जम्‍मू कश्‍मीर, उत्‍तराखंड, तमिलळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये स्वच्छ पाण्यात या प्रजातीचे मासे आढळून येतात. या राज्यांमध्ये ट्राउट माशांची पैदास करण्यासाठी इंफ्रास्‍ट्रक्‍चर देखील उभे आहे. याचबरोबर ट्राउट फिश फार्मिंग (Trout Fish Farming) करण्यासाठी या ठिकाणी अनेक कार्यक्रम देखील राबवण्यात आले आहेत. व्यवसायासाठी किती खर्च - हा व्यवसाय सुरु करण्यासाठी खूप भांडवलाची गरज आहे. 15X2X1.5 मीटरच्या जागेत सुरुवात करण्यासाठी तुम्हाला 1 लाख रुपये भांडवलाची गरज आहे. याचबरोबर 6 हजार रुपये सामान खरेदीसाठी आणि 22,500 रुपये बीज घेण्यासाठी आणि 1 लाख 45 हजार रुपये फीडिंगवर खर्च होणार आहेत. जर या व्यवसायासाठी तुम्ही कर्ज घेतलं, तर पहिल्या वर्षीच्या 26,700 व्याजासह 3 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. याचबरोबर 20 टक्के सबसिडी देखील मिळणार आहे. अनुसूचित जाती आणि जमातीच्या व्यक्तींना 25 टक्के सबसिडी दिली जाणार आहे.

हे वाचा - 3 मिनिटांमधून करू शकता लाखोंची कमाई, घरबसल्या करावं लागेल हे काम

या पद्धतीने होणार कामे - या व्यवसायाच्या माध्यमातून सुरुवातीच्या पहिल्या वर्षात जवळपास 3 लाख 23 हजार रुपयांची कमाई होऊ शकते. यानंतर हळूहळू भांडवल कमी झाल्यानंतर उत्पन्न वाढण्यास सुरुवात होते. दुसऱ्या वर्षांमध्ये जवळपास साडेतीन लाख रुपये कमाई होऊ शकते. त्यामुळे हा व्यवसाय करून तुम्ही वर्षाला लाखो रुपयांची कमाई करू शकता. शेती आणि अन्य शेतीपूरक व्यवसाय म्हणून हा व्यवसाय खूप फायदेशीर आहे.
Published by:Karishma
First published:

Tags: Start business

पुढील बातम्या