मराठी बातम्या /बातम्या /मनी /

दिवाळीत पुन्हा दूध महागणार? धक्कादायक कारण आलं समोर

दिवाळीत पुन्हा दूध महागणार? धक्कादायक कारण आलं समोर

गेल्या चार महिन्यांत जनावरांच्या चाऱ्याच्या किमतीत २० टक्क्यांनी वाढ झाली.

गेल्या चार महिन्यांत जनावरांच्या चाऱ्याच्या किमतीत २० टक्क्यांनी वाढ झाली.

गेल्या चार महिन्यांत जनावरांच्या चाऱ्याच्या किमतीत २० टक्क्यांनी वाढ झाली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई : पेट्रोल-डिझेल त्यापाठोपाठ घरगुती गॅसही महाग झाला आहे. भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत. आता जीवनावश्यक वस्तुंपैकी महत्त्वाचं म्हणजे दूधही महागण्याची शक्यता आहे. सध्या देशात जनावरांच्या चाऱ्याचे भाव गगनाला भिडले आहेत. हिरवा चारा आणि पेंढ्याच्या तीव्र टंचाईमुळे चाऱ्याचे दर 9 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचले आहेत.

गेल्या चार महिन्यांत जनावरांच्या चाऱ्याच्या किमतीत २० टक्क्यांनी वाढ झाली. चाऱ्याबरोबरच जनावरांना दिल्या जाणाऱ्या पेंढ्यांच्या दरातही वाढ झाल्याने पशुपालकांसमोर संकट निर्माण झाले आहे. दुधाच्या किमतीतही कमी वाढ झाली आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागत आहे.

दक्षिण हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये गव्हाच्या पेंढ्याचा भाव प्रतिक्विंटल दोन हजार रुपयांवर गेला. आता अवकाळी पावसामुळे बाजरी पिकाचे नुकसान झाल्याने पेंढ्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे बाजरीचा पेंढाही जनावरांना दिला जातो.

हे वाचा-Gas Price Hike: महागाईत आणखी एक झटका! CNG 12 रुपयांनी महागण्याची शक्यता

पावसामुळे बाजरीची कडवट शेतातच विरघळली आहे. हिरवा चारा आणि पेंढा यांच्या अभावामुळे दुग्धोत्पादनावर वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. जनावरांना खायला देण्यासाठी चारा शेतकऱ्याच्या अवाक्याबाहेर जात आहे. त्यातून मिळणारं उत्पन्न कमी आहे.

हे वाचा-Petrol Diesel Prices: 5 राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ, टाकी फुल्ल करण्याआधी पाहा आजचे दर

आधीच आस्मानी संकट, अवेळी होणारा पाऊस आणि त्यापाठोपाठ वाढणाऱ्या चाऱ्याच्या किंमती यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. येत्या काळात दुधाचे दर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता तसेही दुधासाठी लिटरमागे ६० ते ७० रुपये मोजावे लागत आहेत. काही ठिकाणी ८० रुपये लिटर दूध आहे. हे दर वाढण्याची शक्यता आहे.

First published: