Home /News /money /

महागाईचा बोजा वाढत असताना कुणी खरेदी केलं सर्वाधिक सोनं? IGPC रिपोर्टमध्ये आश्चर्यकारक माहिती समोर

महागाईचा बोजा वाढत असताना कुणी खरेदी केलं सर्वाधिक सोनं? IGPC रिपोर्टमध्ये आश्चर्यकारक माहिती समोर

महागाईचा सर्वाधिक फटका मध्यमवर्गाला बसत असल्याचे सांगितले जाते, पण इंडिया गोल्ड पॉलिसी सेंटरच्या (IGPC) अहवालानुसार, देशातील सर्वाधिक सोने खरेदीही मध्यमवर्ग करत आहे.

    मुंबई, 12 एप्रिल : कोरोना साथीच्या आजारातून अजूनही पूर्णपणे सुटका झालेली नाही, तोच महागाईनेही डोकं वर काढलं आहे. देशात सर्वत्र वाढत्या किमतीमुळे लोक हैराण झाले असतानाच एका अहवालाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. महागाईचा सर्वाधिक फटका मध्यमवर्गाला बसत असल्याचे सांगितले जाते, पण इंडिया गोल्ड पॉलिसी सेंटरच्या (IGPC) अहवालानुसार, देशातील सर्वाधिक सोने खरेदीही मध्यमवर्ग करत आहे. म्हणजेच एकीकडे हा वर्ग महागाईच्या प्रभावाने सर्वाधिक त्रस्त झालेला दिसतो, तर दुसरीकडे सोन्याची बंपर खरेदीही करत आहे. आयजीपीसीने म्हटले आहे की, देशातील मध्यमवर्ग भौतिक सोन्याची सर्वाधिक खरेदी करत आहे. श्रीमंतांचा कल डिजिटल सोन्याकडे IGPC ने Gold and Gold Markets 2022 च्या अहवालात सांगितले आहे की देशातील श्रीमंत वर्ग किंवा उच्च उत्पन्न असलेले लोक डिजिटल किंवा पेपर फॉरमॅट सोने खरेदी करण्यास प्राधान्य देतात. दरडोई अधिक सोने खरेदी करण्याबाबत बोलायचे झाले तर त्यात उच्च वर्ग किंवा उच्च उत्पन्न मिळवणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्याचबरोबर एकूण खरेदीचा आकडा पाहिला तर त्यात मध्यमवर्ग आघाडीवर राहतो. Gold Price Today: सोने महागलं, चांदीही तेजीत; चेक करा एक तोळे सोन्यासाठी नवे दर 10 लाखांपर्यंत कमाई करणारे 56 टक्के सोने खरेदी करतात अहवालात असे म्हटले आहे की असा वर्ग ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2-10 लाख रुपये आहे, ते देखील सर्वाधिक सोने खरेदी करतात. अशा श्रेणीतील लोक एकूण सोन्याच्या 56 टक्के खरेदी करतात. याचे कारण इतर गुंतवणूक पर्यायांच्या तुलनेत हा सर्वात सुरक्षित मानला जातो. 10 लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेले उच्च मध्यम आणि श्रीमंत वर्गातील लोक भांडवली नफ्यासाठी त्यांचे अतिरिक्त भांडवल गुंतवतात. सोने, एफडीपेक्षा स्टॉक मार्केट, डेरिव्हेटिव्ह आणि रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यास ते प्राधान्य देतात. देशभरातील सुमारे 40 हजार लोकांच्या सर्वेक्षणाच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. जीएसटी किंवा नोटाबंदीचा कोणताही परिणाम नाही नोटाबंदी किंवा जीएसटीच्या अंमलबजावणीसारख्या महत्त्वाच्या निर्णयांचाही देशातील सोने खरेदीवर कोणताही परिणाम झाला नसल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. गेल्या पाच वर्षांत देशातील 74 टक्के उच्च उत्पन्न असलेल्या लोकांनी सोने खरेदी केले आहे. यादरम्यान, इतर वस्तूंच्या खरेदीवर मोठा प्रभाव दिसून आला, परंतु सोन्याची मागणी सतत वाढत गेली. बँक अकाऊंटमध्ये पैसे नसतील तरी वेळप्रसंगी काढता येतील 10,000 रुपये; काय आहे सरकारची सुविधा?  लग्नसमारंभात सोन्याची जास्तीत जास्त खरेदी भारतीय ग्राहक लग्नसमारंभात सर्वाधिक सोने खरेदी करतात. या अहवालात असे म्हटले आहे की, एकूण सोन्यापैकी 65-70 टक्के सोने सण किंवा लग्नाच्या निमित्ताने खरेदी केले जाते, तर इतर प्रसंगी केवळ 30-35 टक्केच खरेदी केले जाते. 41 टक्के लोक केवळ लग्नसोहळ्याच्या निमित्ताने सोने खरेदी करतात, तर 31 टक्के लोक कोणत्याही विशेष प्रसंगाशिवाय सोने खरेदी करतात. महामारीने सोन्याचा मोह वाढवला आयजीपीसीचे अध्यक्ष अरविंद सहाय म्हणतात की, कोरोना महामारीनंतर लोकांचा सोन्याचा मोह वाढला आहे. आतापर्यंत इतर पर्यायांमध्ये गुंतवणूक केलेले लोक आता सोन्याला अधिक प्राधान्य देतात. कठीण काळात सोनं जेवढं कामी येतं, इतर कोणत्याही गुंतवणुकीतून तेवढा फायदा मिळत नाही, असा त्यांचा विश्वास आहे. शेअर बाजारावर जागतिक तणावासह इतर घटकांच्या मोठ्या प्रभावामुळे, गुंतवणूकदार सोन्याला सुरक्षित आश्रयस्थान मानतात.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Gold and silver prices today, Gold prices today, Investment

    पुढील बातम्या