MIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज

MIDC मध्ये 865 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज

MIDC Recruitment 2019 - महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळात नोकरीची मेगा भरती सुरू आहे. जाणून घ्या कुठल्या पदावर आहे व्हेकन्सी

  • Share this:

मुंबई, 16 जुलै : तुम्हाला महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळात काम करण्याची चांगली संधी आहे. MIDC हा महाराष्ट्र सरकारचा मोठा प्रकल्प आहे. याचा संबंध जमीन, रस्ते, पाणी पुरवठा, ड्रेनेज सिस्टिम, रस्त्यावरचे दिवे याच्याशी येतो. MIDC मध्ये आता मोठी भरती होणार आहे. 865 जागांवर व्हेकन्सी आहे. कनिष्ठ अभियंता (विद्युत & यांत्रिकी), लघुलेखक (निम्न श्रेणी), वरिष्ठ लेखापाल, सहाय्यक, लिपिक टंकलेखक, भूमापक, तांत्रिक सहाय्यक, जोडारी,पंपचालक,वीजतंत्री, वाहनचालक, शिपाई, मदतनीस अशा पदांसाठी व्हेकन्सी आहेत.

MIDC च्या व्हेकन्सीसाठी अख्ख्या महाराष्ट्रात पोस्टिंग असेल.

SBI ची खास सेवा, बँकेत न जाता मिळतील 'या' 6 सुविधा

या पदांवर आहे भरती

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

कनिष्ठ अभियंता (विद्युत आणि यांत्रिकी)

लघुलेखक (निम्न श्रेणी)

वरिष्ठ लेखापाल

सहाय्यक

लिपिक टंकलेखक

भूमापक

तांत्रिक सहाय्यक

जोडारी

पंपचालक

वीजतंत्री

वाहनचालक

शिपाई

मदतनीस

कार किंवा बाइक चालवताय? मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच

17 जुलै 2019पासून तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 7ऑगस्ट 2019.

अर्ज ऑनलाइन करता येईल. त्यासाठी तुम्ही https://mahapariksha.gov.in/OnlinePortal/loginPage इथे क्लिक करा.

दरम्यान, मोदी सरकारच्या 100 दिवसांच्या अजेंड्यांमध्ये नोकऱ्या आणि रोजगार वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. नीती आयोग आता नव्या सरकारसाठी आर्थिक अजेंडा बनवणार आहे. यामध्ये देशाची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी काही महत्त्वाच्या सुधारणा करण्यात येणार आहेत.

बुडणाऱ्याला Apple Watch चा आधार, असा वाचला जीव!

या आर्थिक अजेंड्यामध्ये खाजगी क्षेत्रातली गुंतवणूक, शेती उत्पादन वाढवण्यावर भर आणि रोजगार वाढवण्यासाठीच्या कार्यक्रमाचा समावेश आहे. विरोधकांनी या निवडणुकीत रोजगार कमी झाल्याच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला धारेवर धरलं होतं पण लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहिले तर या मुद्द्यावरून जनतेने सरकारला नाकारलेलं नाही हेच लक्षात येतं.

कौशल्य विकासाला प्राधान्य देण्यासाठी सरकार खाजगी शिक्षण संस्थांना कर्ज देणार आहे. त्याशिवाय खाजगी कंपन्यांना सवलती देण्याचाही सरकार विचार करत आहे. स्किल इंडियासाठी सरकारने 3400 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. आता हा निधी आणखी वाढवण्यात येईल.

VIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 16, 2019 03:12 PM IST

ताज्या बातम्या