Home /News /money /

Metro Brands शेअरमध्ये 20 टक्क्यांची उसळी, Rakesh Jhunjhunwala यांच्याकडेही शेअर्स

Metro Brands शेअरमध्ये 20 टक्क्यांची उसळी, Rakesh Jhunjhunwala यांच्याकडेही शेअर्स

मेट्रो ब्रँड्स लिमिटेड (metro brands ltd) ने तिसऱ्या तिमाहीत 100.85 कोटी कन्सॉलिडेट नेट प्रॉफिट नोंदवला आहे. त्याच वेळी, कंपनीचा निव्वळ नफा मागील वर्षी याच कालावधीत 65.22 कोटी रुपये होता.

    मुंबई, 17 जानेवारी : देशातील आघाडीची फुटवेअर रिटेल चेन मेट्रो ब्रँड्स लिमिटेडच्या (Metro Brands ltd) शेअर्समध्ये सोमवारी प्रचंड वाढ झाली. कंपनीच्या शेअर्सने 20 टक्क्यांपर्यंत उसळी मारली. बीएसईवर कंपनीचे शेअर्स 19.99 टक्क्यांनी वाढून 609.45 रुपयांवर पोहोचले. त्याच वेळी, NSE वर 19.99 टक्क्यांच्या वाढीसह शेअरची अप्पर सर्किटसह 609.50 रुपयांवर पोहोचली. कंपनीच्या शेअर्सच्या वाढीमागे, कंपनीचे तिसऱ्या तिमाहीत आलेले चांगले निकाल हे एक कारण आहे. डिसेंबर 2021 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीने निव्वळ नफ्यात 54.63 टक्क्यांनी वाढ केली आहे. मेट्रो ब्रँड्स लिमिटेड (metro brands ltd) ने तिसऱ्या तिमाहीत 100.85 कोटी कन्सॉलिडेट नेट प्रॉफिट नोंदवला आहे. त्याच वेळी, कंपनीचा निव्वळ नफा मागील वर्षी याच कालावधीत 65.22 कोटी रुपये होता. Multibagger Share : मस्तच! 'हा' स्टॉक ठरला मल्टिबॅगर; एक लाख रुपयांचे झाले 15 लाख डिसेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत, कंपनीच्या कामकाजातील महसूलही 59.02 टक्क्यांनी वाढला आणि तो 483.77 कोटी रुपये राहिला. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत तो 304.21 कोटी रुपये होता. 2021-22 च्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा एकूण खर्च 47.26 टक्क्यांनी वाढून 362.59 कोटी रुपये झाला आहे. Electric Vehicle संबंधित शेअर तुमचा पोर्टफोलियो चमकवू शकतात, 'या' शेअर्सवर नजर ठेवा राकेश झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचे शेअर्स बिग बुल राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांच्याकडेही कंपनीचे शेअर्स आहेत. कंपनीने IPO द्वारे 1367.5 कोटी रुपयांचा निधी उभारला होता. कंपनीने फिटफ्लॉप (Fitflop) सोबत विक्री आणि वितरणासाठी भागीदारी केली आहे. मेट्रो ब्रँड्सची स्थापना 1955 मध्ये झाली. शूज व्यतिरिक्त, ते त्याच्या दुकानात बेल्ट, पिशव्या, मोजे आणि वॉल्ट्स देखील विकतात. 31 डिसेंबर 2021 पर्यंत, कंपनीची 140 शहरांमध्ये 629 स्टोअर्स होती. याशिवाय, हे भारतातील क्रोक्सचे रिटेल पार्टनर आहे आणि देशभरात 159 स्टोअर चालवतात.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Share market

    पुढील बातम्या