मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Mega Monsoon Sale: केवळ 999 रुपयात करा विमानप्रवास, मिळेल फ्री फ्लाइट व्हाउचर देखील; वाचा सविस्तर

Mega Monsoon Sale: केवळ 999 रुपयात करा विमानप्रवास, मिळेल फ्री फ्लाइट व्हाउचर देखील; वाचा सविस्तर

या बजेट एअरलाइनकडून मेगा मॉन्सून सेल (Mega Monsoon Sale) अंतर्गत प्रवाशांना 999 रुपयांत विमानप्रवास करण्याची सुविधा देण्यात येत आहे.

या बजेट एअरलाइनकडून मेगा मॉन्सून सेल (Mega Monsoon Sale) अंतर्गत प्रवाशांना 999 रुपयांत विमानप्रवास करण्याची सुविधा देण्यात येत आहे.

या बजेट एअरलाइनकडून मेगा मॉन्सून सेल (Mega Monsoon Sale) अंतर्गत प्रवाशांना 999 रुपयांत विमानप्रवास करण्याची सुविधा देण्यात येत आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar
नवी दिल्ली, 25 जून: तुम्ही येणाऱ्या काही दिवसात विमानप्रवास (Air Travel) करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तुम्ही स्वस्तात विमानप्रवासाचा आनंद घेऊ शकतो. कोरोनाकाळात (Coronavirus) प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विविध एअरलाइन्स कंपन्या वेगवेगळ्या ऑफर्स घेऊन आल्या आहेत. स्पाइसजेट या बजेट एअरलाइनकडून मेगा मॉन्सून सेल (Mega Monsoon Sale) अंतर्गत प्रवाशांना 999 रुपयांत विमानप्रवास करण्याची सुविधा देण्यात येत आहे. ही ऑफर 1 ऑगस्ट 2021 ते 31 मार्च 2021 पर्यंत असणार आहे. मात्र याकरता बुकिंग तुम्हाला आजपासून (25 जूनपासून) 30 जूनपर्यंत करता येणार आहे. याआधी इंडिगो आणि विस्ताराने देखील 1099 रुपयात विमानप्रवास करता येईल अशी घोषणा केली आहे. देशांतर्गत विमानप्रवासावर मिळणार सूट या सेलचा फायदा तुम्हाला देशांतर्गत विमानप्रवास अर्थात डोमेस्टिक फ्लाइट्ससाठी घेता येणार आहे. स्पाइसजेटच्या वेबसाइटवर डिरेक्ट बुकिंग केल्यानंतर Grofers, Mfine, Medibuddy, MobiKwik आणि The PARK Hotels कडून काही स्पेशल ऑफर्सही तुम्हाला देण्यात येतील. तिकिट बुक केल्यानंतर तुम्हाला 1000 रुपयांपर्यंतचे फ्लाइट व्हाउचर देखील मिळेल, ज्याचा फायदा तुम्ही 1 ऑगस्ट 2021 नंतर घेऊ शकता. हे वाचा-Monsoon Sale: अवघ्या 1099 रुपयात करा विमानप्रवास, या एअरलाइन्सची घोषणा या मार्गांसाठी 999 रुपये शुल्क 999 रुपयांचं प्रवासभाडं इन्क्लूझिव्ह आहे. अर्थात याव्यतिरिक्त कोणतंही शुल्क तुम्हाला द्यावं लागणार नाही. हैदराबाद-बेळगाव, बेळगाव-हैदराबाद, चेन्नई-हैदराबाद, चेन्नई-बेंगळुरु इ. रुट्सचं भाडं 999 रुपयांपासून सुरू होत आहे. हे वाचा-गोव्याचा प्लॅन रद्दच करावा लागणार! कोरोनामुळे घेण्यात आला महत्त्वाचा निर्णय फ्री फ्लाइट व्हाउचर आता तिकिट बुक करण्यावर एअरलाइनकडून फ्री फ्लाइट वाउचर (Free Flight Vouchers) देखील देण्यात येत आहे. याची किंमत जास्तीत जास्त 1000 रुपयांपर्यंत असेल. व्हाउचरची बुकिंग व्हॅलिडिटी एका महिन्याची अर्थात 1 जुलै ते 31 जुलै एवढी आहे, याचा वापर तुम्ही 1 ऑगस्ट 2021 ते 31 मार्च 2022 दरम्यान करू शकता. याशिवाय ग्राहक केवळ 149 रुपयात आवश्यक Add-on जसं की आवडती सीट निवडणं किंवा प्राथमिक सेवा इ. गोष्टी मिळवू शकता.
First published:

Tags: Airplane, Airport, Coronavirus, Money

पुढील बातम्या