मराठी बातम्या /बातम्या /मनी /

1500 रुपयांचे 5400 कोटी केले; मसाला किंग धर्मपाल गुलाटी यांचा थक्क करणारा जीवनप्रवास

1500 रुपयांचे 5400 कोटी केले; मसाला किंग धर्मपाल गुलाटी यांचा थक्क करणारा जीवनप्रवास

धर्मपाल गुलाटी असे एक नाव आहे जे आपण  प्रत्येक दिवशी, प्रत्येक वेळी लक्षात ठेवू शकतो. त्यांनी आयुष्यात शून्यापासून सुरुवात करून यशाचं शिखर गाठलं. अशा मसाला किंगचे (MDH) जीवन प्रेरणास्रोत आहे.

धर्मपाल गुलाटी असे एक नाव आहे जे आपण प्रत्येक दिवशी, प्रत्येक वेळी लक्षात ठेवू शकतो. त्यांनी आयुष्यात शून्यापासून सुरुवात करून यशाचं शिखर गाठलं. अशा मसाला किंगचे (MDH) जीवन प्रेरणास्रोत आहे.

धर्मपाल गुलाटी असे एक नाव आहे जे आपण प्रत्येक दिवशी, प्रत्येक वेळी लक्षात ठेवू शकतो. त्यांनी आयुष्यात शून्यापासून सुरुवात करून यशाचं शिखर गाठलं. अशा मसाला किंगचे (MDH) जीवन प्रेरणास्रोत आहे.

नवी दिल्ली, 01 मार्च : एक असा ब्रॅण्ड (Brand) जो वर्षानुवर्षे आपलं जेवण चविष्ट बनवतोय, पदार्थांची लज्जत वाढवतोय. हा ब्रॅण्ड भारतातच नाही तर जगभरातील अनेक देशांमधील घरातील किचन्सवर राज्य करतोय. जेव्हा तुम्ही किचनमध्ये जाता तेव्हा एक मसाला पॅकेट तुमची नजर वेधतं असतो. या पॅकेटवरील लाल पगडी परिधान केलेल्या गृहस्थांचा फोटो तुमच्या नजरेत भरतो. होय...हा ब्रॅण्ड म्हणजे एमडीएच मसाले. (MDH Masala) या ब्रॅण्डवरील फोटोमधील गृहस्थ म्हणजे या ब्रॅण्डचे संस्थापक महाशय धर्मपाल गुलाटी (Mahashay Dharampal Gulati). धर्मपाल गुलाटी यांचं नाव आपण घेतलं नाही असा एकही दिवस जात नाही. जीवनात शून्यापासून सुरुवात करुन यशाची शिखरे पादाक्रांत करणारे हे मसाला किंग सर्वांचे प्रेरणा स्त्रोत ठरले आहेत. आठवणींच्या पेटीतून जाणून घेऊया मसाला किंग धर्मपाल गुलाटी यांच्याविषयी...

छोट्याशा दुकानापासून ते प्रसिध्द ब्रॅण्डपर्यंतचा प्रवास

दिल्लीतील एका छोट्या दुकानापासून व्यवसायाला सुरुवात करणाऱ्या धर्मपाल गुलाटी यांनी ‘एमडीएच’ला भारतातील प्रमुख मसाल्यांच्या ब्रॅण्डपैकी एक बनवलं. 1953 मध्ये त्यांनी दिल्लीतील (Delhi) प्रसिद्ध चांदनी चौकात एक छोटं दुकान भाडेतत्वावर घेतलं. त्याचं नामकरण ‘महाशियां दि हट्टी’ (एमडीएच) असं करण्यात आलं. या दुकानातून त्यांनी मसाला विक्री सुरु केली. त्यानंतर किर्ती नगरमध्ये एक उत्पादन युनिट सुरु करण्यासाठी त्यांनी जमीन खरेदी केली. हेच एमडीएच सद्यःस्थितीत 50 विविध प्रकारच्या मसाल्यांची निर्मिती करते. देशभरात त्यांचे 15 कारखाने आहेत. जगभरात ही उत्पादने विक्री होतात. एमडीएच कारखान्यांमध्ये मशीनरीच्या सहाय्याने एका दिवसात तब्बल 30 टन मसाल्यांचं उत्पादन होऊ शकतं.

सर्वात जास्त पगार घेणारी व्यक्ती :

ही उत्पादनं सुरू झाल्यानंतर धर्मपाल गुलाटी यांनी देशभरात मसाले, तांदुळ आणि कपडे तसेच अन्य उत्पादनांची विक्री सुरुवात केली. एमडीएच मसाले परदेशातही निर्यात (Export) होतात. मसाला किंग धर्मपाल गुलाटी हे 2017 मध्ये सर्वाधिक पगार घेणारे कंझ्युमर गुडस प्रॉडक्ट कंपनीचे सीईओ होते. त्यांचा 2020 मध्ये आयआयएफएल हुरुन इंडिया रिच यादीत भारतातील सर्वाधिक वयस्कर श्रीमंत व्यक्ती म्हणून समावेश झाला होता. केवळ 1500 रुपयांपासून सुरु झालेल्या एमडीएचची आज सुमारे 5400कोटींपेक्षा अधिक संपत्ती आहे. 2019 मध्ये भारत सरकारनं धर्मपाल गुलाटी यांना तिसरा सर्वौच्च नागरीक पुरस्कार पद्मभुषण देऊन सन्मानित केले.

90 टक्के वेतन देत होते दान :

धर्मपाल गुलाटी यांनी महाशय चुन्नीलाल चॅरिटेबल ट्रस्टला आपलं 90 टक्के वेतन दान दिलं आहे. हा ट्रस्ट दिल्लीमध्ये 250 बेडचे हॉस्पिटल, झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांसाठी चार शाळा आणि एक फिरते हॉस्पिटल (Mobile Hospital) चालवतो. एप्रिल 2020 मध्ये कोरोना योध्दयांसाठी त्यांनी 7500 पीपीई किट दिले होते. धर्मपाल गुलाटी यांना पतंग उडवणे, पैलवानकी आणि कबुतरबाजीची विशेष आवड होती. तसेच त्यांना पंजाबी पदार्थ विशेष आवडत. जगभरातील महागड्या कार खरेदी करण्याचाही त्यांना शौक होता. त्यांच्या कार कलेक्शनमध्ये अनेक लक्झरी कार्स आहेत. त्यामध्ये रोल्स रॉईस घोस्ट (Rolls- Royce- Ghost) ही 7 कोटींची कार देखील आहे. तसेच क्रिसलर 300, मर्सिडीज बेंझ (Mercedes Benz M-Class ML 500), टोयोटा इनोव्हा क्रिस्टासारख्या (Toyota Innova Crista) अनेक महागड्या गाड्या त्यांच्याकडे आहेत. त्याशिवाय होंडा, टोयोटासह अन्य कार्सही त्यांच्या कलेक्शनमध्ये आहेत.

अवश्य वाचा -  पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; IAS अधिकाऱ्याने विद्यार्थ्यांना दिलं यशाचं खास तंत्र

3 डिसेंबर 2020 रोजी वयाच्या 97 व्या वर्षी निधन :

धर्मपाल गुलाटी यांचा जन्म 1919 मध्ये पाकिस्तानमधील (Pakistan) सियालकोट इथं झाला होता. आता हे शहर पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात आहे. त्यांच्या वडिलांचं तिथं एक छोटं दुकान होतं; परंतु, 1947 च्या फाळणीनंतर त्यांचा परिवार भारतात दिल्लीमध्ये वास्तव्यास आला. दिल्लीत येण्यापूर्वी त्यांचा परिवार काही काळ अमृतसरमधील रिफ्युजी कॅंपमध्ये वास्तव्यास होता. तिथं धर्मपाल गुलाटी टांगा चालवण्याचे काम करीत होते. धर्मपाल यांचं निधन 3 डिसेंबर 2020 रोजी वयाच्या 97 व्या वर्षी झाले.

First published:

Tags: Business News, India, Inspiring story, Money