मावळ, गणेश दुडम : अवकाळी पावसाने बळीराजा मेटाकुटीला आलाय. एकीकडे शेतात राबायचे तर दुसरीकडे हाता तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला जातो. या निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सध्या राज्यात बघायला मिळतोय. याला अपवाद मावळातील एक उच्चशिक्षित तरुण शेतकरी आहे. लाखोंची आयटी पार्क मधील नोकरी सोडून त्याने गावठी कोंबडी पालनचा व्यवसाय निवडला. यातून तो दररोज लाखो रुपये कमावतो. तर महिन्याकाठी कोट्यवधी रुपयांची उलाढाल गावरान कोंबड्याच्या माध्यमातून करतोय. इतक्यावरच न थांबता त्याने राज्यभर गावठी कोंबड्यांचा व्यवसाय पसरवला. यात राज्यातील अनेक शेतकरी जोडले जाऊ लागलेत. आतापर्यंत पाचशे शेतकरी परिवार, नांदेड, परभणी, सांगली, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, पुणे, मुंबईसह; अनेक जिल्ह्यात गावरान कोंबड्यांच्या मार्फत शेतकऱ्यांच्ये मनोधैर्य वाढवत आहे. या शेतकरी अभियंत्यांचं नाव सौरभ तापकीर आहे. तो अवघा तेवीस वर्षांचा आहे. कठोर मेहनतीनंतर त्याला हे यश मिळालंय.
कब्बडीची आवड असलेल्या सौरभला कब्बडीत करिअर करायचं होत. त्यासाठी त्याला हरियाणात प्रशिक्षणासाठी पाठवलं. कबड्डी म्हटलं की शारीरिकदृष्ट्या बलवान आणि बुद्धिमान व्यक्तीमत्व लागते. म्हणून त्याने अंडी, दुधाचा रतीब लावला. कालांतराने तो मावळात आला, त्याला प्युअर अंडी, दुध मिळत नसल्याने वडिलांकडे नाराजी व्यक्त केली. म्हणून त्याने गावरान अंडी विकत आणून त्यापासून कोंबड्या तयार करण्यास सुरुवात केली. कालांतराने त्यांची संख्या हजारोच्या घरात झाली सध्या या तरुण शेतकऱ्याकडे पंधरा हजाराहून अधिक गावरान कोंबड्या आहेत.
सध्या राज्यातील अनेक शेतकऱ्यांना कमी किंमतीत गावरान कोंबड्या मिळतात. मात्र काही महिन्यांनी याच शेतकऱ्यांनकडून अंडी आणि चिकन घेतो. यातून त्याला आणि शेतकऱ्यांना मोठा फायदा होतो. या तरुण शेतकऱ्याकडे रोजगार असल्याने राज्यातील पाचशे शेतकऱ्यांचा चमू आहे. त्यामुळे अनेक शेतकरी, कामगारांचा संसाराचा गाडा चालतो. अवघ्या तेवीसाव्या वर्षी त्याने घेतलेली गगन भरारी राज्यातील शेतकरी वर्गाला नक्कीच प्रेरणा देणारी ठरेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Business News, Success story