मराठी बातम्या /बातम्या /मनी /

दीड वर्षात गुंतवणूकदार मालमाल; 172 रुपयांचा शेअर 2871 रुपयांवर!

दीड वर्षात गुंतवणूकदार मालमाल; 172 रुपयांचा शेअर 2871 रुपयांवर!

दीड वर्षात Mastek ltd share ची किंमत 172 रुपयांवरून 2871 वर पोहोचली आहे. 27 मार्च 2020 रोजी 172.35 वर बंद झालेला शेअर आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 1565 टक्क्यांनी वाढून 2,871 रुपयांवर पोहोचला आहे.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 14 नोव्हेंबर : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी (Share MArket Investors) संयम राखणे खुप महत्त्वाचे असते. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, केवळ खरेदी-विक्री करून पैसा कमावला जात नाही, तर संयम बाळगून पैसा कमावला जातो. आजकाल अनेक मल्टीबॅगर शेअर्सनी (Multibagger stock tips) गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा दिला आहे. या शेअर्सनी गुंतवणूकदारांना गुंतवणुकीच्या मूल्याच्या तुलनेत अनेक पटींनी परतावा दिला आहे. असाच एक शेअर आहे Mastek Ltd. या शेअरने फक्त दीड वर्षात 1500 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ नोंदवली (Stock return)  आहे.

दीड वर्षात शेअरची किंमत 172 रुपयांवरून 2871 वर पोहोचली आहे. 27 मार्च 2020 रोजी 172.35 वर बंद झालेला शेअर आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 1565 टक्क्यांनी वाढून 2,871 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्यावर्षी 27 मार्च रोजी Mastek च्या शेअर्समध्ये गुंतवलेले एक लाख रुपये आज 16.65 लाख रुपये झाले असतील. त्या तुलनेत या काळात सेन्सेक्स 102.43 टक्क्यांनी वधारला आहे.

IPO News: दोनच दिवसात येणार या कंपनीचा आयपीओ, गुंतवणूकदारांसाठी कमाईची संधी!

हा मिड कॅप स्टॉक आज BSE वर 2,871 च्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचला. सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर शेअर्समध्ये तेजी आली आहे. Mastkek शेअर 100 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग अॅवरेजपेक्षा (Moving Average) जास्त पण 5 दिवस, 20 दिवस आणि 50 दिवसांच्या मूव्हिंग अॅव्हरेजपेक्षा कमी आहे. कंपनीच्या एकूण 5065 शेअर्सची बीएसईवर 1.47 कोटी रुपयांचा ट्रेड केला.

लग्नसराईच्या काळात सोन्याच्या किंमतीचा भडका! सोनं 9 महिन्यातील सर्वोच्च स्तरावर

ब्रोकरेजचं म्हणणं काय?

बीएसईवर आयटी फर्मचे मार्केट कॅप 8,375 कोटी रुपये झाले. या वर्षाच्या सुरुवातीपासून आयटी स्टॉकमध्ये 148.04 टक्के वाढ झाली आहे आणि एका वर्षात 217.43 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एका महिन्यात स्टॉक 8.65 टक्क्यांनी घसरला आहे. स्टॉकने 19 ऑक्टोबर 2021 रोजी 52 आठवड्यांचा हाय 3,666 रुपये गाठला. ब्रोकरेजने सांगितले की, मास्टेक शेअरची किंमत सध्याच्या बाजारभावापेक्षा 3,300 रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

First published:

Tags: Money, Share market