मराठी बातम्या /बातम्या /मनी /बेस्ट मायलेज आणि कमी किंमतीमध्ये खरेदी करा कार, तुमच्याकडे फक्त 3 दिवस

बेस्ट मायलेज आणि कमी किंमतीमध्ये खरेदी करा कार, तुमच्याकडे फक्त 3 दिवस

maruti car

maruti car

1 एप्रिलपासून कारच्या किंमती वाढणार आहेत. त्यामुळे तुम्ही जर कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई : पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे अनेकांची पहिली पसंती आता गाडीच्या मायलेजला असते. बहुतांशजण आता अशा कार खरेदी करण्यास प्राधान्य देतात, ज्या बजेटमध्ये आहेत आणि मायलेजदेखील चांगलं आहे. अशीच एक कार म्हणजे ‘मारुती सुझुकी सेलेरियो’.

    मारुतीच्या सर्वोत्तम मायलेज कारपैकी ही एक आहे. सेलेरियो पेट्रोल तसंच सीएनजी व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. ही कार तुम्ही 1 लाख रुपयांपेक्षा कमी डाउनपेमेंट करून घरी आणू शकता. तसंच जर तुम्ही कारवर 9 टक्के व्याजदरानं कर्ज घेतलं आणि त्याचा कालावधी 7 वर्षांचा असेल, तर तुम्हाला खूपच कमी हप्ते भरावे लागतील, व तुमचा ईएमआय फक्त 8 हजार रुपायांच्या आसपास येईल.

    Car Loan घ्यायचंय? जाणून घ्या किती असावी तुमची मिनिमम सॅलरी

    सेलेरियोचं मायलेज 24.97 kmpl ते 35.6 kmpl आहे. कारच्या ऑटोमॅटिक व्हेरियंटचे मायलेज 26.68 kmpl आहे. मॅन्युअल पेट्रोल व्हेरियंटचे मायलेज 25.24 kmpl आहे. मॅन्युअल सीएनजी व्हेरियंटचे मायलेज 35.6 kmpl आहे. पेट्रोल आणि सीएनजीमध्ये ही सर्वांत इंधन कार्यक्षम हॅचबॅक कार आहे.

    इंजिन मायलेजसाठी प्रसिद्ध

    चांगल्या मायलेजसाठी कारमध्ये के-सीरिजचं एक लिटरचं पेट्रोल इंजिन लावण्यात आलं आहे. जे 67 PS पॉवर आणि 89 Nm टॉर्क जनरेट करतं. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन किंवा 5-स्पीड एएमटीशी जोडलेलं आहे. सीएनजी व्हेरियंटमध्ये केवळ 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन मिळतं व हे इंजिन 56.7PS पॉवर आणि 82 Nm टॉर्क जनरेट करतं. याव्यतिरिक्त, सीएनजी टाकीची क्षमता 60 लिटर आहे.

    सेफ्टी आणि फीचर्स

    सेलेरियोच्या फीचर्सबद्दल बोलायचं झाल्यास, यात 7-इंच टचस्क्रीन, पुश-बटण स्टार्ट/स्टॉप सिस्टम, पॅसिव्ह की-लेस एंट्री आणि मॅन्युअल एसी यांसारख्या फीचर्सचा समावेश आहे. सेफ्टीसाठी, कारमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, हिल-होल्ड असिस्ट, ईबीडीसह एबीएस आणि रिअर पार्किंग सेन्सर यांसारखी फीचर्स आहेत. मारुती सेलेरियोची स्पर्धा भारतीय बाजारपेठेतील टाटा टियागो, मारुती वॅगन आर आणि सिट्रॉएन सी3 सारख्या लोकप्रिय कारशी आहे.

    तुम्ही Google वर सर्च करताय का कस्टमर केअरचा नंबर? SBI कडून ग्राहकांना अलर्ट

    जाणून घ्या कारची किंमत

    सेलेरियोची एक्स-शोरूम किंमत 5.35 लाख रुपयांपासून सुरू होते, जी 7.13 लाख रुपयांपर्यंत जाते. ही गाडी ‘एलएक्सआय’, ‘व्हीएक्सआय’, ‘झेडएक्सआय’ आणि ‘झेडएक्सआयप्लस’ या चार 4 मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. यात सीएनजी पर्याय फक्त सेकेंड बेस मॉडेल व्हीएक्सआय ट्रिममध्ये उपलब्ध आहे. सेलेरियो 6 मोनोटोन रंगांमध्ये उपलब्ध असून यात कॅफीन ब्राउन, फायर रेड, ग्लिस्टेनिंग ग्रे, सिल्की सिल्व्हर, स्पीडी ब्लू आणि व्हाइट असे पर्याय आहेत. सेलेरियोची बूट स्पेस 313 लिटर आहे.

    First published:
    top videos

      Tags: Car