Elec-widget

मंदीवर तोडगा काढण्यासाठी मनमोहन सिंग यांचा पुढाकार, मोदी सरकारला दिला हा सल्ला

मंदीवर तोडगा काढण्यासाठी मनमोहन सिंग यांचा पुढाकार, मोदी सरकारला दिला हा सल्ला

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अर्थव्यवस्थेच्या वाढीवर चिंता व्यक्त केली आहे. 'द हिंदू' या वृत्तपत्रात त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्थितीबद्दल एक सविस्तर लेख लिहिला आहे.

  • Share this:

दिल्ली, 18 नोव्हेंबर : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अर्थव्यवस्थेच्या वाढीवर चिंता व्यक्त केली आहे. 'द हिंदू' या वृत्तपत्रात त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्थितीबद्दल एक सविस्तर लेख लिहिला आहे. भारताची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याबद्दल त्यांनी त्यांची मतं मांडली आहेत.

सरकार आणि वेगवेगळ्या संस्थांवर नागरिकांचा विश्वास कमी झाल्यामुळे अर्थव्यवस्थेत मंदी आली आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. देशाच्या GDP वाढीचा दर 15 वर्षांपासून सगळ्यात खालच्या स्तरावर आहे. बेरोजगारीचं वाढतं प्रमाणही चिंताजनक आहे. बेरोजगारीने गेल्या 45 वर्षांत नीचांक गाठला आहे. बँकांचं कर्ज बुडवण्याचं प्रमाणही वाढलं आहे. त्याचबरोबर विजेचं उत्पादन गेल्या 15 वर्षांत सगळ्यात कमी आहे याचाही त्यांनी उल्लेख केलाय.

उद्योजकांना चिंता

मनमोहन सिंग यांनी लिहिलं आहे, माझी काही उद्योगपतींशी भेट झाली. सरकारी अधिकारी आपल्याला हैराण करतायत, अशी त्यांची तक्रार आहे. बँका नवं कर्ज देऊ इच्छित नाहीत कारण त्यांना कर्ज बुडण्याचा धोका वाटतो. त्याचबरोबर नवे लोक उद्योग उभारू इच्छित नाहीत. काही लोकांच्या वाईट हेतूंमुळे त्यांना आर्थिक गर्तेत जाण्याची भीती वाटते.

(हेही वाचा : नोकरी बदलल्यानंतर हे काम केलं नाहीत तर होईल नुकसान)

Loading...

या सगळ्या स्थितीमुळे लोकांना असहाय्य वाटतं आहे. त्यांचं ऐकणारा कोणी नाही, असं त्यांना वाटतं. हे अविश्वासाचं आणि भीतीचं वातावरण निर्माण होण्यासाठी मोदी सरकारच जबाबदार आहे, असंही मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे.

सरकारने अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी नवं धोरण आखलं पाहिजे, असं मत त्यांनी या लेखात व्यक्त केलंय. ज्यामुळे मागणी वाढेल अशा पद्धतीची धोरणं ठरवायला हवीत, अशी सूचना त्यांनी केलीय. भारत हा जगातल्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. आपला स्पर्धक असलेल्या चीनमध्ये सध्या मंदी आहे. याचा फायदा उठवून भारताने अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न करावे, असंही मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे.

==================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 18, 2019 06:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...