मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Investment Options : दिवाळीच्या बोनसची योग्य गुंतवणूक करा, जास्त फायदा होईल

Investment Options : दिवाळीच्या बोनसची योग्य गुंतवणूक करा, जास्त फायदा होईल

गुंतवणूक करताना जोखीम विरहित गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही फिक्स्ड डिपॉझिटमध्ये (Fixed Deposit) तुमचे पैसे गुंतवू शकता. सध्या बँका दीर्घकालीन मुदत (Bank interest on fixed deposit) ठेवींवर 5 ते 6.5 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहेत.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 2 नोव्हेंबर : सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस (Diwali Bonus) हमखास मिळतो. मात्र जवळपास सर्व बोनसची रक्कम अनेकजण सनासुदीच्या खरेदीवर खर्च करतात. जर ही रक्कम दरवर्षी कुठेतरी गुंतवली तर दीर्घकाळात (Long term investment) तो एक मोठा फंड बनू शकतो. त्यामुळे निवृत्तीनंतर, मुलांचे शिक्षण आणि लग्न यासारखी लाँग टर्म प्लान सहज आखले जातील. त्यामुळे तुमचा दिवाळी बोनस गुंतवण्याचा योग्य पर्याय कोणता असू शकतो, याबद्दल माहिती घेऊया.

फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposit)

गुंतवणूक करताना जोखीम विरहित गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही फिक्स्ड डिपॉझिटमध्ये (Fixed Deposit) तुमचे पैसे गुंतवू शकता. सध्या बँका दीर्घकालीन मुदत (Bank interest on fixed deposit) ठेवींवर 5 ते 6.5 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहेत. बोनस FD मध्ये गुंतवण्याचा निर्णय घेण्यापूर्वी, बँका आणि पोस्ट ऑफिसद्वारे ऑफर केलेल्या व्याजदरांची तुलना करा.

दिवाळीत Cryptocurrency तुम्हाला करेल मालामाल, जाणून घ्या कधी, कुठे करावी गुंतवणूक आणि तज्ज्ञांचा सल्ला

म्युच्युअल फंड (Mutual Fund)

गुंतवणूकदार म्हणून तुम्ही जोखीम घ्यायला तयार असाल तर दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करण्यासाठी Mutual Fund हा सर्वोत्तम पर्याय आहे. इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये डेट म्युच्युअल फंडांपेक्षा जास्त अस्थिरता असते, परंतु इक्विटी एमएफ योजनांमध्ये दीर्घ कालावधीत महागाईवर मात करणारा परतावा निर्माण करण्याची क्षमता असते. त्यामुळे तुम्ही दीर्घकालीन उद्दिष्टासाठी बचत करत असल्यास, तुम्ही तुमचा दिवाळी बोनस इक्विटी MF योजनांमध्ये गुंतवू शकता. सुरुवातीला, तुम्ही इंडेक्स फंड निवडू शकता, जे कमी अस्थिर आहेत.

सोने आणि सॉवरेन गोल्ड बॉण्ड (Gold and Sovereign Gold Bond)

सणासुदीचा काळ भारतात सोने खरेदी करण्याचा सर्वोत्तम काळ मानला जातो. विशेषत: धनत्रयोदशी आणि दिवाळी दरम्यान मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जाते. मात्र तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जर तुम्ही गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करत असाल, तर सोने खरेदी करण्याऐवजी सॉवरेन गोल्ड बॉण्डमध्ये (SGB) गुंतवणूक करणे चांगले.

दिवाळीत सोन्याची झळाळी वाढणार का? वाचा काय आहे तज्ज्ञांचं म्हणणं

SGB ​​खरेदी करण्याचे अनेक फायदे आहेत. व्यवहारावर शून्य व्यवहार शुल्क आहे आणि तुम्हाला गुंतवणुकीच्या रकमेवर 2.5 टक्के व्याज मिळते. तसेच, जर तुम्ही मुदतपूर्तीपर्यंत SGB ठेवले तर, कोणताही कॅपिगेन कर आकारला जात नाही. SGB मध्ये किमान 1 ग्रॅम सोने खरेदी करू शकता. एक व्यक्ती एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 4 किलो सोने खरेदी करू शकते. तर ट्रस्ट किंवा संस्था 20 किलोपर्यंत सोने खरेदी करू शकतात.

First published:

Tags: Investment, Money