5 वर्षात मिळवा 15 लाख रुपये, अशी करा गुंतवणूक

5 वर्षात मिळवा 15 लाख रुपये, अशी करा गुंतवणूक

तुम्ही दर महिन्याला थोड्या पैशांची गुंतवणूक केलीत तर तुम्ही मोठा फंड तयार करू शकाल.

  • Share this:

मुंबई, 17 एप्रिल : तुम्हाला पाच वर्षांनी तुमच्या मुलांना उच्च शिक्षण द्यायचंय किंवा कार खरेदी करायचीय किंवा एखादं मोठं काम आहे, तर मग तुमच्याकडे मोठा फंड हवा आणि तो जमवणं अवघड नाही. तज्ज्ञांच्या मते सुरक्षित भविष्यासाठी योग्य दिशेन प्लॅनिंग करायला हवं. तुम्ही दर महिन्याला थोड्या पैशांची गुंतवणूक केलीत तर तुम्ही मोठा फंड तयार करू शकाल. गुंतवणुकीचा चांगला पर्याय म्हणजे म्युच्युअल फंडात गुंतवणूक. तीही एसआयपी म्हणजे SIP पद्धतीनं.

म्युच्युअल फंडच का? - शेअर बाजार सतत नव्या उंचीवर जाऊन पोचतोय. इक्विटी म्युच्युअल फंडानं गेल्या 15 ते 20 वर्षांत 20 टक्के किंवा त्याहून जास्त रिटर्न  दिलेत. जे गुंतवणूकदार थोडाफार धोका पत्करू शकतात, त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय आहे. शिवाय ही गुंतवणूक तुम्ही 5 वर्षांची ठेवलीत तर रिस्कही कव्हर होऊ शकते.

कसे होणार 5 वर्षांत 15 लाख रुपये? - एसकोर्ट सिक्युरिटीचे रिसर्च हेड आसिफ इकबाल सांगतात, चांगल्या इक्विटी फंडात दर महिन्याला 15 हजार रुपये गुंतवणूक करायला हवी. रोजच्या खर्चातून तुम्ही 500 रुपये वाचवा. मग ही गुंतवणूक करणं सोपं जाईल. वर्षाला 20 टक्के रिटर्न मिळाले तर 5 वर्षात 16 लाख रुपये होतील. 5 वर्ष तुम्ही 9 लाख रुपयांची गुंतवणूक केलीत तर ती 16 लाख रुपये होईल. म्हणजे तुम्हाला 7 लाख रुपये जास्त मिळतील.

इथे पैसे गुंतवणं सुरक्षित आहे? - आसिफ इकबाल सांगतात, म्युच्युअल फंडातली गुंतवणूक हा उत्तम पर्याय आहे. दर महिन्याला थोडी थोडी गुंतवणूक केलीत तर मोठा फंड निर्माण होऊ शकतो. म्युच्युअल फंडमधल्या गुंतवणुकीत धोका कमी असतो. तुम्ही तुमचा पूर्ण पैसा एकाच कंपनीत गुंतवला आणि ती कंपनी बुडली तर मोठं नुकसान होईल. पण म्युच्युअस फंडात तुमचे पैसे अनेक कंपन्यांमध्ये गुंतवले जातात. वेगवेगळ्या शेअर्स आणि बाँडमध्ये गुंतवले जातात. म्हणजे एका कंपनीतले पैसे बुडाले तरी दुसरीकडून जास्त मिळाल्यानं नुकसान होत नाही.

सुंदरम मिडकॅप फंड-लाँचपासून रिटर्न : 25.64%, कमीत कमी SIP : 250 रुपये

HDFC फंड-लाँचपासून रिटर्न : 24.80%, कमीत कमी  SIP : 500 रुपये

VIDEO: रिव्हर राफ्टिंग करताना मरता मरता वाचले 3 तरुण

First published: April 17, 2019, 12:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading