मुंबई, 17 नोव्हेंबर: युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाद्वारे (UIDAI) आधार कार्ड क्रमांक जारी केला जातो. आजच्या काळात आधारकार्ड हे आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचं कागदपत्र बनलं आहे. भारतात वृद्धांपासून नवजात बाळापर्यंत सर्वांसाठी (New born baby Aadhar) आवश्यक आहे. बँक असो की कोणतंही सरकारी काम, सर्वत्र या कागदपत्राची गरज असते. म्हणूनच प्रत्येकानं ते बनवणं आवश्यक आहे. जर तुमच्या घरातही नवजात बाळ असेल तर तुम्ही त्याचं आधार कार्ड बनवावं, ते नेहमीच उपयोगी पडतं. ते कसं काढायचं,याची प्रोसेस आज आपण जाणून घेऊया.
UIDAI ने आता मुलांसाठी देखील आधार कार्ड घेणं अनिवार्य केलं आहे आणि आता पालकांना नवजात बाळासाठी आधार कार्ड देखील सहज मिळू शकेल. नवजात बाळासाठी आधार कार्ड ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही अर्ज करता येईल. ऑफलाइन प्रक्रियेसाठी एखाद्याला जवळच्या आधार नोंदणी केंद्राला भेट द्या आणि सर्व महत्त्वाची कागदपत्रे जमा करून फॉर्म भरा.
ऑनलाइन अर्ज कसा करावा?
UIDAI फक्त नवजात मुलाच्या आधार कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. यासाठी अर्जदारांना UIDAI वेबसाइटवर जावं लागेल, नोंदणी लिंकवर क्लिक करावं लागेल आणि तेथे आवश्यक ती सर्व माहिती भरावी लागेल.
हेही वाचा: टेन्शन सोडा! Pan Card हरवलं तर हरवू द्या, असं डाउनलोड करा ई-पॅन कार्ड
समजून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस-
या गोष्टींची घ्या विशेष काळजी-
ऑनलाइन फॉर्म सबमिट करण्यापूर्वी आणि नवीन जन्मलेल्या बाळाच्या आधार कार्डसाठी अपॉइंटमेंट शेड्यूल करण्यापूर्वी, पालकांनी मुलाच्या आधार तपशीलामध्ये जन्मतारीख तपासण्याचा सल्ला दिला जातो कारण ती फक्त एकदाच दुरुस्त केली जाऊ शकते. तसेच लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही आहे की जेव्हा ते पाच वर्षांचं होतील तेव्हा त्यांना त्यांची बायोमेट्रिक माहिती जसे की बोटांचे ठसे इत्यादींची आधारशी नोंदणी करावी लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aadhar Card, Small child