Home /News /money /

सरकारी योजनांमध्ये छोटी गुंतवणूक करा आणि मिळवा 4 लाखांचा लाभ, वाचा सविस्तर

सरकारी योजनांमध्ये छोटी गुंतवणूक करा आणि मिळवा 4 लाखांचा लाभ, वाचा सविस्तर

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) याद्वारे नागरिकांना 4 लाखांच्या सुविधांचा फायदा घेता येईल.

    मुंबई, 22 ऑक्टोबर : सरकारी बँकेत  तुमचं खातं (Government Bank) असेल तर तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो. बँक आपल्या ग्राहकांना अनेक फायदे (Benefits From Government Scheme) देत असतात, मात्र त्यांची अनेकांना माहिती नसते. सरकारी बँकेत तुमचं खातं दरमहा फक्त 28.5 रुपये जमा करून पूर्ण 4 लाख रुपयांचा लाभ घेऊ शकता. बँकेकडून 4 लाख रुपयांचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला सरकारच्या दोन योजनांमध्ये गुंतवणूक करावी लागेल. या योजना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) आहेत. या योजनांमध्ये गुंतवणुकीची रक्कम खूप कमी आहे. या दोन योजनांमध्ये फक्त 342 रुपये वार्षिक जमा करावे लागतात. जन धन खातेधारकाना 2 लाखांचा फायदा जन धन ग्राहकांना बँकेकडून ही सुविधा दिली जाते. बँक ग्राहकांना 2 लाख रुपयांपर्यंत अपघाती विमा संरक्षणाची सुविधा मिळते. Personal Loan मुदतीआधी बंद करायचं आहे का? किती दंड लागतो आणि क्रेडिट स्कोअरवर काय परिणाम होतो? चेक करा PMJJBY योजनेमार्फत 2 लाखांचा लाभ प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी (PMJJBY) वार्षिक हफ्ता 330 रुपये आहे. या योजनेअंतर्गत व्यक्तीला जीवन विमा संरक्षण मिळते. विमाधारक व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपये मिळतात. ही रक्कम तुमच्या बँक खात्यातून ECS द्वारे घेतली जाते पंतप्रधान सुरक्षा विमा योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) अत्यंत कमी प्रीमियमवर विमा पुरवते. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही केंद्र सरकारची एक योजना आहे, ज्या अंतर्गत खातेधारकाला फक्त 12 रुपयांमध्ये 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते. Finance Tips : तुमच्या पैशाचं असं करा नियोजन? आर्थिक संकटात अडकणार नाही अटल पेन्शन योजना कमी गुंतवणुकीवर पेन्शनच्या हमीसाठी केंद्र सरकारने अटल पेन्शन योजना सुरू केली आहे. अटल पेन्शन योजनेअंतर्गत सरकार दरमहा 1000 ते 5000 रुपयांच्या पेन्शनची हमी देते. सरकारच्या या योजनेमध्ये 40 वर्षांपर्यंतची व्यक्ती अर्ज करू शकते.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Central government, Investment, Money

    पुढील बातम्या