नवी दिल्ली, 4 सप्टेंबर : ऑनलाइन फूड डिलिव्हरीसाठी झोमॅटो (Zomato) ही जगभरातील प्रसिद्ध कंपनी आहे. मात्र यादरम्यान झोमॅटोने ब्रिटेन आणि सिंगापूर येथून आपला व्यवसाय गुंडाळल्याचं वृत्त समोर आलं आहे. भारतीय शेयर बाजाराला झोमॅटोने याबाबत माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, झोमॅटोने ब्रिटेनमधील सब्सिडरी झोमॅटो यूके लिमिटेड आणि सिंगापूरमधील झोमॅटो मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचा व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत आहे. (Major damage to Zomato company is preparing to wrap up business between the two countries)
व्यवसायावर नाही होणार परिणाम
झोमॅटोने आपल्या वक्तव्यात दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटेन आणि सिंगापूरची सहाय्यक कंपनी त्यांच्या व्यवसायासाठी महत्त्वपूर्ण नव्हते. त्यामुळे हे बंद झाल्यानंतर झोमॅटोच्या व्यवसायावर कोणताही परिणाम होणार नाही. कंपनीने ऑगस्ट महिन्यात आपली अमेरिकेतील सहाय्यक कंपनीला बंद केलं होतं. दुसरीकडे नेक्स्टेबल इंकने आपली भागीदारी 100,000 डॉलरमध्ये विकली होती.
हे ही वाचा-Govt Yojana' चा कोणता SMS तुम्हालाही आला आहे का? तर वेळीच व्हा सावधान!झोमॅटोला 360.4 कोटी रुपयांचं नुकसान
सांगितलं जात आहे की, चालू वित्त वर्षाच्या पहिल्या तिमाहीत झोमॅटोला 360.7 कोटी रुपयांचं शुद्ध नुकसान झालं आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने सांगितलं होतं की, तिमाहीमध्ये कंपनीचं एकूण खर्च वाढला आहे आणि ते आता 1,259.7 कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं आहे.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.