मराठी बातम्या /बातम्या /मनी /

महिंद्रा समुहाच्या या कंपनीवर कर्जाचा डोंगर, तोट्यातून बाहेर पडण्यासाठीची धडपड अयशस्वी

महिंद्रा समुहाच्या या कंपनीवर कर्जाचा डोंगर, तोट्यातून बाहेर पडण्यासाठीची धडपड अयशस्वी

महिंद्रा अँड महिंद्रा समुहाची (Mahindra & Mahindra) कोरियातील सहाय्यक कंपनी असणाऱ्या सांगयांग मोटार कंपनी (Sangyang Motor Company) 60 अब्ज वॉन म्हणजेच तब्बल 408 कोटी रुपयांचे कर्ज फेडू शकलेली नाही.

नवी दिल्ली,16 डिसेंबर : महिंद्रा अँड महिंद्रा समुहाची (Mahindra & Mahindra) कोरियातील सहाय्यक कंपनी असणारी सांगयांग मोटार कंपनी (Sangyang Motor Company) 60 अब्ज वॉन म्हणजेच तब्बल 408 कोटी रुपयांचे कर्ज फेडू शकलेली नाही. या कंपनीवर एकूण 100 अब्ज कोरियाई वॉन अर्थात 680 कोटी रुपयांचे कर्ज असल्याची माहिती महिंद्रा अँड महिंद्रा समुहानं भारतीय शेअर बाजाराला (Indian Share Markets) दिली आहे. कोरोना साथीमुळं जगभरातील उद्योग, व्यवसायांना मोठा फटका बसला आहे. वाहन उद्योगालाही याचा तडाखा बसला असून, हळूहळू स्थिती सुधारत असली तरी अनेक कंपन्यांचा तोटा प्रचंड आहे. त्यांचा कर्जाचा बोजाही वाढला आहे. यापैकीच एक आहे, महिंद्रा समूहाची कोरियातील सहयोगी कंपनी सांगयांग मोटार कंपनी (SYMC). महिंद्रा समुहानं 2010मध्ये खरेदी केली होती सांगयांग कंपनी - महिंद्रा समुहानं तोट्यात असलेली सांगयांग मोटार कंपनी (SYMC) 2010 मध्ये खरेदी केली होती. ही कंपनी 60 अब्ज कोरियाई वॉन म्हणजे तब्बल 408 कोटी रुपयांचे कर्ज फेडू शकलेली नाही, असं महिंद्रा समूहानं शेअर बाजाराला कळवलं आहे. यामध्ये जेपी मॉर्गन चेस बँकेचे 60 अब्ज वॉन, बीएनपी परिबासचे 10 अब्ज वॉन तर बँक ऑफ अमेरिकाचे 30 अब्ज वॉनचे कर्ज आहे, असंही कंपनीनं सांगितलं आहे. (हे वाचा-Gold Price Today: सोनंचांदी खरेदी करणाऱ्यांचं टेन्शन वाढलं,पुन्हा एकदा वधारले दर) एप्रिलमध्ये महिंद्राच्या संचालक मंडळानं सांगयांग कंपनीत नवीन भांडवल गुंतवण्याचा निर्णय रद्द केला होता. तर सांगयांगचं व्यवस्थापन आणि कामगार संघटनेनं महिंद्रा अँड महिंद्रा समुहाला पुढच्या तीन वर्षांसाठी 500 अब्ज कोरियाई वॉन म्हणजेच 40.6 कोटी डॉलर्सचा निधी देण्याची मागणी केली होती. कंपनीला तोट्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न अयशस्वी महिंद्रा अँड महिंद्रा समुहानं सांगयांग मोटार कंपनीला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी अनेक प्रयत्न केले, पण त्यात यश आलं नाही. सांगयांग कंपनीत महिंद्राची 75 टक्के भागीदारी आहे. या कंपनीला 2017 मध्ये 66 अब्ज वॉनचा तोटा झाला होता. त्या आधीच्या वर्षात कंपनीला 58 अब्ज वॉनचा नफा झाला होता. 2017 पासून आतापर्यंत कंपनी तोट्यातच राहिली. 2018 मध्ये 62 अब्ज वॉनचा, तर 2019 मध्ये तिला तब्बल 341 अब्ज वॉनचा तोटा झाला होता.
First published:

Tags: Business News, Economy, Tech Mahindra

पुढील बातम्या