PMC बँक खातेधारकांना ठाकरे सरकारचा दिलासा; मोठ्या निर्णयाची शक्यता

PMC बँक खातेधारकांना ठाकरे सरकारचा दिलासा; मोठ्या निर्णयाची शक्यता

पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक PMC bank घोटाळ्यामुळे अनेक सामान्य खातेधारकांचे कष्टाचे पैसे अडकले असताना नव्या सरकारकडून काही चांगली बातमी येण्याची शक्यता आहे.

  • Share this:

मुंबई, 5 डिसेंबर : पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक PMC bank घोटाळ्यामुळे अनेक सामान्य खातेधारकांचे कष्टाचे पैसे अडकले असताना नव्या सरकारकडून काही चांगली बातमी येण्याची शक्यता आहे. पीएमसी बँकेच्या विलीनीकरणासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार आहे. खातेदारांच्या भल्यासाठी या बँकेचं विलीनीकरण आता राज्य सहकारी बँकेत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अर्थात हा निर्णय केवळ राज्य सरकारचा नसेल. यासाठी रिझर्व बँकेची परवानगी लागेल.

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारने PMC बँकेसंदर्भात वेगवान हालचाली करण्यास सुरुवात केल्याचं कळतं. खातेदारांचं आणखी नुकसान टाळण्यासाठी या बँकेचं विलीनीकरण करण्याचा निर्णय घ्यावा लागेल. त्यासाठी RBI शी चर्चा करण्यात राज्य सरकार पुढाकार घेणार असल्याचं समजतं.

पीएमसी बँकेच्या खात्यावरून जर तुम्ही एसआयपी किंवा म्यूच्युअल फंडात गुंतवणूक केली असेल तर त्यावर परिणाम होईल. कोणत्याही गुंतवणूकीसाठी तुम्हाला दुसरं खातं लिंक करावं लागेल. असं नाही झालं तर रिझर्व्ह बँक बंदी हटवेपर्यंत तुम्हाला म्युच्यूअल फंडाचा लाभ घेता येणार नाही. बँक दिवाळखोरीत निघाली तरी तुमचे पैसे बुडणार नाहीत. अशा स्थितीत खातेधारकांच्या खात्यावर असलेल्या विम्याच्या माध्यामातून एक लाख रुपयांपर्यंत रक्कम परत मिळेल. एकूण बचित जास्त असेल तर त्यापैकी काही भाग मिळू शकतो. रिझर्व्ह बँकेनं पीएमसी बँकेवर निर्बंध घातले आहेत. हे निर्बंध सहा महिन्यांसाठी असून त्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाईल. सध्या रिझर्व्ह बँकेनं बँक कर्मचाऱ्यांना वेतन, दैनिक खर्च, व्याज इत्यादी देण्यास परवानगी दिली आहे.

-------------

अन्य बातम्या

अर्थव्यवस्थेवरून मोदी सरकारला दणका, RBI ने जाहीर केला GDP

चिदंबरम यांनी सांगितलं, तुरुंगातून मोकळ्या हवेत येताच पहिल्यांदा काय केलं?

केस काळे करण्यासाठी तुम्हा वापरताय हेअर डाय? होऊ शकतो 'हा' गंभीर आजार

पंतप्रधान मोदींनी 9वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेसंदर्भात केलं ट्वीट

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: December 5, 2019, 3:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading