गणेश विसर्जनाला गालबोट, राज्यात 15 जणांचा बुडून मृत्यू

निष्काळजीपणा, पोहणं येत नसतानाही पाण्यात उतरणे, सुरक्षा नियमांची पायमल्ली करणं आणि आनंदाच्या नावाखाली बेभान होणं हे यासाठी कारणीभूत ठरलं.

News18 Lokmat | Updated On: Sep 12, 2019 10:14 PM IST

गणेश विसर्जनाला गालबोट, राज्यात 15 जणांचा बुडून मृत्यू

मुंबई 12 सप्टेंबर : विघ्नहर्त्या गणेशाला सर्व राज्यात साश्रूपूर्ण नयनांनी निरोप देत असतानाच या आनंदाला गालबोट लागलं. राज्याच्या विविध भागात विसर्जनाच्या वेळी 15 जणांचा बुडून मृत्यू झाला. निष्काळजीपणा, पोहणं येत नसतानाही पाण्यात उतरणे, सुरक्षा नियमांची पायमल्ली करणं आणि आनंदाच्या नावाखाली बेभान होणं हे यासाठी कारणीभूत ठरलं. सर्वाधिक 6 जणांचा मृत्यू हा विदर्भात झालाय. तर कोकणात 5 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे आनंदावर विरजन पडलं.

विदर्भात 6 जणांचा मृत्यू

अमरावती - अमरावती जिल्ह्यातल्या भातकुली तालुक्यातील वाठोडा शुकलेश्वर इथं गणेश विसर्जनादरम्यान नदी पात्रात 4 जणांचा बुडून मृत्यू झाला. मृतदेह शोधण्यासाठी पोलीस व गावकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. गणेश विसर्जनाच्या जल्लोशात विसर्जनाच्या वेळी अनेक जण नदी पात्रात उतरले होते. त्यात या चार जणांचाही समावेश होता. मात्र नदीतल्या पाण्याची खोली कळाली नसल्याने ते सर्व पाण्यात बुडाले. त्यांना पोहोणही येत नसल्याने त्यांना पाण्यातून बाहेर निघता आलं नाही.

पाणी मिळाल्याशिवाय 'बाप्पां'चं विसर्जन नाही, शेतकरी बसले उपोषणाला

भंडारा - लाखांदूर तालुक्यातील ढोलसर गावात राहणारा लोकेश देवराम शिवणकर हे भाविक गणपती विसर्जना दरम्यान मासळ शेतशिवारातील नाल्यात वाहून गेला. त्यांचे वय 40 वर्षे होतं. आज ढोलसर वरुन वाजत गाजत गणपती विसर्जना ची मिरवणुक मासळ जवळील नाल्यावर आली असताना मासळ- बाचेवाडी रस्त्यावर असलेल्या नाल्यावर गणपती विसर्जना दरम्यान मुर्ती ढकलतेवेळी  पाण्याच्या प्रवाहात हा इसम वाहुन गेला. उपस्थित नागरिकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने त्याला यश आलं नाही.

Loading...

वर्धा - गणपती विसर्जनाला गेलेल्या युवकाचा मृत्यू झालाय. जुनापाणी येथे शेतातील विहिरीत विसर्जन करीत असताना तरुण बुडाला. गुणवंत गाखरे असं मृतकाचं नाव. कारंजा तालुक्याच्या जुनापाणी शिवारातील घटना

कोकणात 5 जणांचा मृत्यू

कोकणात गणपती विसर्जनाच्या वेळी एकूण 5 जण बुडाले. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन तर रत्नागिरी जिल्ह्यात तीन जणांचा समावेश आहे. पाण्याची खोली आणि वेग न कळाल्यामुळे हे भाविक पाण्यात बुडाले.

काँग्रेस-राष्ट्रवादीनंतर आता शिवसेनेचं टार्गेट मनसे, 'या' तालुक्यात खिंडार

श्रीरामपूर - श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गावात सौरभ विठ्ठल कर्डीले हा 18 वर्षांचा युवक  गणेश विसर्जनाच्या वेळी नदीत वाहून गेला. नागरिकांच्या मदतीने शोधकार्य करण्यात आलं पण त्यात यश आलं नाही.

कराड- आगाशिव नगर येथेही चेतन शिंदे हा गणेश भक्त वाहून गेला. कोयणा नदीत गणरायाच्या विसर्जनावेळी ही घटना घटली. कराड आगाशिव नगर येथील गणेश मंडळाची मूर्ती विसर्जन करताना ही घटना घडली. पाण्याच्या प्रवाहामुळे मुलगा सापडला नाही.

शहापूर - दुसऱ्या एका घटनेत शहापूर  तालुक्यातील कुंडनच्या नदी तोल जावून एका 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. कल्पेश प्रकाश जाधव  (  वय 12 ) असं मुलाचं नाव असून तो कुंडन गावातील कातकरी वाडी राहाणारा आहे. गणपती विसर्जनाच्या वेळी तोल गेल्याने  नदीच्या तो प्रवाहात वाहून गेला आणि त्यातच त्याचा अंत झाला.

शरद पवारांच्या भेटीनंतर उदयनराजेंचा भाजप प्रवेश ठरला? तारखही निश्चित

नांदेड - मराठवाड्यात नांदेडजवळही  गणेश  विसर्जनाच्या वेळी  खदानीत बुडून एका भाविकांचा मृत्यू झाला. शशिकांत कोडगीरवार असं त्या युवकाचं नाव असून तो 21 वर्षांचा होता.  हदगाव तालुक्यातील तामसा गावातली ही घटना आहे. गावकऱ्यांनी त्याचा  मृतदेह खदानीबाहेर काढला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 12, 2019 10:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...