सायन्स ग्रॅज्युएट्सना राज्याच्या प्रकल्पात मोठी व्हेकन्सी,असं असेल कामाचं स्वरूप

सायन्स ग्रॅज्युएट्सना राज्याच्या प्रकल्पात मोठी व्हेकन्सी,असं असेल कामाचं स्वरूप

Jobs, Kisan Mitra - तुम्हाला राज्याच्या प्रकल्पात काम करण्याची संधी आहे. जाणून घ्या त्याबद्दल

  • Share this:

मुंबई, 25 जुलै : तुम्हाला राज्याच्या प्रकल्पात काम करायचंय? मग एक चांगली संधी आहे. महाराष्ट्र शासनाच्या पथदर्शी प्रकल्पात 702 जागांवर भरती आहे. इथे किसान मित्र या पदासाठी व्हेकन्सी आहे. सायन्स ग्रॅज्युएट्सना इथे काम करायची संधी मिळणार आहे.

पद - किसान मित्र

पदाची संख्या - 702

शैक्षणिक पात्रता - B.Sc (कृषी) किंवा B.Sc (उद्यानविद्या)

वयाची अट - 1 जुलै 2019 रोजी 21 ते 46 वर्षापर्यंत हवं. 46 वर्षानंतरच्या व्यक्तींनी अर्ज करू नका.

खासगी कंपनीतही मोठी पगारवाढ, 'या' कंपन्यांसाठी आहे खूशखबर

नोकरीचं ठिकाण पूर्ण महाराष्ट्रभर असेल.

कामाचं स्वरूप - नेमून दिलेल्या गावांमध्ये  शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी अत्याधुनिक तंत्राची माहिती देणं, तंत्रज्ञान प्रचार आणि प्रसारासाठी मल्टिमीडियाचा वापर करणं, गावातली कृषीविषयक पायाभूत साधन सुविधांची माहिती संकलीत करणं, प्रयोगशील आणि प्रगतीशील शेतकऱ्यांची गाथा संकलित करणं, ग्रामसभा घेणं अशी बरीच कामं असतात.

LIC ची सर्वोत्तम पाॅलिसी, रोज फक्त 9 रुपये खर्च आणि लाखोंचा फायदा

अर्जाची फी नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 जुलै 2019

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी https://sarthi-maharashtragov.in/ इथे क्लिक करा

तसंच, तुम्ही सिव्हिल इंजिनियरिंग केलंय आणि नोकरी शोधताय? मग तुम्हाला चांगली संधी आहे. महाराष्ट्र जलसंपदा विभागात 500 जागांसाठी भरती आहे. या पदासाठी 10वी उत्तीर्ण आणि सिव्हिल इंजिनियरिंग डिप्लोमा किंवा तत्सम डिगरी हवी. याबद्दल अधिक माहिती पुढीलप्रमाणे-

पद -  कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट-ब)

पदांची संख्या - 500

शैक्षणिक पात्रता - 10वी उत्तीर्ण आणि सिव्हिल इंजिनियरिंग डिप्लोमा

वयाची अट - 15 ऑगस्ट 2019ला 18 ते 38 वर्षापर्यंत हवं. मागासवर्गीयांना 5 वर्ष सूट मिळेल

व्याजदर कमी झाले तरी 'या' योजनेत अजूनही दुप्पट होतात तुमचे पैसे

नोकरीचं ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र असेल.

अर्ज करायची शेवटची तारीख - 15 ऑगस्ट 2019 ( रात्री 12 वाजेपर्यंत )

अर्जाची फी सामान्य वर्गास 500 रुपये आणि आरक्षण असलेल्यांना 300 रुपये

शिवसेना खासदाराने मोदींना दिली श्रीकृष्णाची उपमा, पाहा हा VIDEO

Tags: jobs
First Published: Jul 25, 2019 06:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading