Home /News /money /

Gold Rate Today: पुण्यात सोन्याचे दर 50000 रुपयांच्या जवळपास, वाचा तुमच्या शहरातील आजचा गोल्ड रेट

Gold Rate Today: पुण्यात सोन्याचे दर 50000 रुपयांच्या जवळपास, वाचा तुमच्या शहरातील आजचा गोल्ड रेट

दररोज सोन्याच्या दरात ठराविक बदल होत असतात. सध्या लग्नसराईचा काळ असल्याने सोन्याच्या दराबाबत अनेकजण अपडेट्स तपासत असतात. याठिकाणी तुम्ही देखील सोन्याचे लेटेस्ट दर (Gold Latest Rates) काय आहेत हे तपासू शकता.

    मुंबई, 09 डिसेंबर: दररोज सोन्याच्या दरात ठराविक बदल होत असतात. सध्या लग्नसराईचा काळ असल्याने सोन्याच्या दराबाबत अनेकजण अपडेट्स तपासत असतात. याठिकाणी तुम्ही देखील सोन्याचे लेटेस्ट दर (Gold Latest Rates) काय आहेत हे तपासू शकता. तुम्ही देखील सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सोनेखरेदी करण्यासाठी बाजारात जाण्यापूर्वी आजचा सोन्याचा दर काय आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. एमसीएक्सवर सोन्याचा भाव एमसीक्सवर (Gold Price on MCX) गुरुवारी सोने आणि चांदीच्या दरात घट झाली आहे (Gold and Silver Rates Today). मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, सोन्याच्या फेब्रुवारीसाठीच्या वायदे किमतीमध्ये 0.10 टक्क्यांची घसरण झाली आहे. या घसरणीमुळे प्रति तोळा सोन्याचा दर आज 48,007 रुपयांवर पोहोचला आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरातही घट झाली आहे. आज एक किलो चांदीचा भाव 0.05 टक्क्यांनी घसरला आहे. या घसरणीनंतर चांदीचा भाव 61,593 रुपयांवर पोहोचला आहे. हे वाचा-SBI खातेधारकांना मिळणार 2 लाखांचा फायदा; काय करावं लागले? 8000 रुपयांनी स्वस्त आहे सोनं सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. अशा स्थितीत सोन्याला मोठी मागणी आहे. तुम्हीही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही चांगली संधी आहे कारण गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोने 8000 रुपयांनी स्वस्त आहे. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचा दर 56200 रुपये प्रति तोळा या स्तरावर पोहोचला होता. शिवाय गुंतवणूकीच्या दृष्टिकोनातून सोने खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे कारण तज्ञांच्या मते, येणाऱ्या काळात सोने महाग होईल आणि गुंतवणूकदारांना मोठा परतावा मिळू शकेल. महाराष्ट्रातील विविध शहरात आज 24 कॅरेट सोन्याचा दर 48 हजारांच्या जवळपास आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव देखील 46 हजारांपेक्षा जास्त आहे. गुड रिटर्न्स आणि बँक बझार या वेबसाइट्सनुसार जाणून घ्या महाराष्ट्रातील विविध शहरातील सोन्याचा दर महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील 24 कॅरेट सोन्याचा दर
    शहर आजचा दर (प्रति तोळा) कालचा दर (प्रति तोळा)
    मुंबई 47840 रुपये 47820 रुपये
    पुणे 49,550 रुपये 49,320 रुपये
    नाशिक 49,550 रुपये 49,320 रुपये
    नागपूर 47840 रुपये 47820 रुपये
    औरंगाबाद 48430 रुपये 48220 रुपये
    कोल्हापूर 48430 रुपये  48,220 रुपये
    लातूर 48430 रुपये  48,220 रुपये
    सांगली 48430 रुपये  48,220 रुपये
    नांदेड 48430 रुपये  48,220 रुपये
    जळगाव 48430 रुपये 48220 रुपये
    महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील 22 कॅरेट सोन्याचा दर
    शहर आजचा दर (प्रति तोळा) कालचा दर (प्रति तोळा)
    मुंबई 46840 रुपये 46820 रुपये
    पुणे 46,220 रुपये 46,090 रुपये
    नाशिक 46,220 रुपये 46,090 रुपये
    नागपूर 46840 रुपये 46820 रुपये
    कोल्हापूर  46120 रुपये 45,920 रुपये
    लातूर  46120 रुपये 45,920 रुपये
    सांगली 46120 रुपये  45,920 रुपये
    नांदेड 46120 रुपये  45,920 रुपये
    जळगाव 46120 रुपये 4,5920 रुपये
    मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा भाव सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता. हे वाचा-आता Internet शिवाय UPI Payments करता येणार! रिझर्व्ह बँकेकडून धोरण जाहीर सोन्याची शुद्धता कशी तपासायची? तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. 'BIS Care App'द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today

    पुढील बातम्या