दिवाळीच्या मार्केटमधून 80 % चायनीज माल गायब, हे आहे कारण

दिवाळीच्या मार्केटमधून 80 % चायनीज माल गायब, हे आहे कारण

मागच्या काही वर्षांत चिनी उत्पादनांच्या विरोधात मोहीम चालवण्यात आली. याचा परिणाम यावेळी दिसून आला. सणासुदीच्या दिवसांत भारतीय उत्पादनांना असलेली मागणी वाढलीय.

  • Share this:

मुंबई, 26 ऑक्टोबर : दिवाळीसाठी खरेदी करायला गेलं की आकाशकंदील, पणत्यांपासून सगळं चायनीज सामान मिळायचं. गेल्या 5-6 वर्षांत मात्र दिवाळीच्या बाजारपेठेतून चायनीज सामान गायब झालंय.

चिनी वस्तूंचा दर्जा घसरल्याने 'मेड इन चायना' सामानाची आयात कमी झाली आहे. यामध्ये 70 ते 80 टक्क्यांची घट झाली. 'मेड इन चायना' च्या ऐवजी 'मेड इन इंडिया' या उपक्रमामुळे हा बदल झालाय.

मागच्या काही वर्षांत चिनी उत्पादनांच्या विरोधात मोहीम चालवण्यात आली. याचा परिणाम यावेळी दिसून आला. सणासुदीच्या दिवसांत भारतीय उत्पादनांना असलेली मागणी वाढलीय. भारतीय उत्पादनं चिनी उत्पादनांपेक्षा दर्जेदार असल्याने  ग्राहकही खूश आहेत.

दिल्ली, मुंबई यासारख्या शहरांत चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याची मोहीम चालवण्यात आली. मागच्या वर्षी चीनमधून पणत्या, कंदील, फुलं, रांगोळीचे रंग, फटाके असं सगळं सामान भारतात येत होतं. सजावटीचं सामान, लायटिंगच्या माळा हे सगळंच बाजारपेठांमध्ये दिसायचं.

(हेही वाचा : भारतीय कंपनीने लाँच केलं जगातलं सर्वात महागडं चॉकलेट, किंमत ऐकून व्हाल थक्क)

इलेक्ट्रॉनिक बाजारातही सामानाचा दर्जा चांगला राहावा यासाठी सरकारने काटेकोर नियम केले आहेत. त्यामुळे या इलेक्ट्रॉनिक सामानाची विक्रीही 50 टक्क्यांनी घटली आहे. भेटवस्तूंच्या बाजारपेठेतही हाच ट्रेंड पाहायला मिळाला. ऑनलाइन शॉपिंगचाही या विक्रीवर परिणाम झालाय.हल्ली इंडोनेशियाहून आयात होणारा मालही दिसू लागला आहे. पण या वस्तू महाग असल्याने त्याला मागणी कमी आहे.

======================================================================================

शरद पवारांच्या दणक्याने उदयनराजे हादरले, पाहा हा VIDEO

First published: October 26, 2019, 9:39 PM IST
Tags: chinamoney

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading