मराठी बातम्या /बातम्या /मनी /Multibagger Stock : सहा महिन्यात 105 टक्के रिटर्न, तुमच्याकडे आहे का हा शेअर?

Multibagger Stock : सहा महिन्यात 105 टक्के रिटर्न, तुमच्याकडे आहे का हा शेअर?

आर्थिक वर्ष 2021-22 च्या दुसऱ्या तिमाहीत लक्स इंडस्ट्रीजची कामगिरी आनंदराठीच्या अंदाजापेक्षा चांगली आहे. या कालावधीत, कंपनीच्या नफ्यात 50 टक्के आणि वर्षभराच्या आधारावर कमाईत 25 टक्के वाढ झाली आहे.

मुंबई, 5 नोव्हेंबर : लक्स इंडस्ट्रीजच्या (Lux Industries) शेअर्सनी या वर्षात आतापर्यंत मल्टीबॅगर रिटर्न (Multibagger Return) दिले आहे. 2021 मध्ये आतापर्यंत हा स्टॉक 131 टक्क्यांनी वाढला आहे. तर गेल्या 6 महिन्यांत 105 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचा पुढील आऊटलूक पाहता, ब्रोकरेज फर्म आनंदराठीला अपेक्षा आहे की तो आणखी वाढेल.

आर्थिक वर्ष 2021-22 च्या दुसऱ्या तिमाहीत लक्स इंडस्ट्रीजची कामगिरी आनंदराठीच्या अंदाजापेक्षा चांगली आहे. या कालावधीत, कंपनीच्या नफ्यात 50 टक्के आणि वर्षभराच्या आधारावर कमाईत 25 टक्के वाढ झाली आहे. मात्र कंपनीच्या व्यवसायाच्या हंगामी स्वरूपामुळे आर्थिक वर्ष 2022 च्या पहिल्या सहामाहीत कंपनीच्या खेळत्या भांडवलाची आवश्यकता जास्त आहे. मात्र वर्षअखेरीस त्यात घट होण्याची शक्यता आहे.

LPG cylinder Subsidy बाबत मोदी सरकारची नवी योजना, कुणाच्या खात्यात येणार पैसे?

आनंदराठीने या स्टॉकवर जारी केलेल्या त्यांच्या नोटमध्ये म्हटले आहे की, लक्स इंडस्ट्रीजचा लाँग टर्म आऊटलूक मजबूत राहील अशी आम्हाला अपेक्षा आहे. पुढे जाऊन कंपनीला तिची मजबूत ब्रँड ओळख, नवीन लॉन्च आणि इनरवेअर व्यवसायातील वाढ यांचा फायदा होईल. 2022-23 या आर्थिक वर्षात कंपनीच्या कमाईत 2-3 टक्के आणि EPS मध्ये 5-6 टक्के वाढ होईल अशी अपेक्षा आहे.

लवकरच तुमची कार धावेल 60 रुपये प्रतिलिटर दरात, मोदी सरकारचा नवा प्लॅन

आनंदराठीने लक्स इंडस्ट्रीजचे रेटिंग बाय टू अपग्रेड केले आहे आणि त्याचे टार्गेट 5,322 रुपये केले आहे. प्रीमियम श्रेणीतील मंदी, वाढती स्पर्धा आणि कच्च्या मालाच्या वाढत्या किमती ही कंपनीसाठी चिंतेची बाब असल्याचेही या नोटमध्ये म्हटले आहे. कच्च्या मालाच्या वाढत्या किमतीला तोंड देण्यासाठी कंपनीने गेल्या 12 महिन्यांत किमती 10-11 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. आम्ही आर्थिक वर्ष 2022 च्या तिसऱ्या तिमाहीत किमतींमध्ये आणखी वाढ पाहू शकतो.

First published:
top videos

    Tags: Money, Share market