मराठी बातम्या /बातम्या /मनी /200 किलो वजनाचा सुरेख 'राम दरबार', जाणून घ्या किंमत आणि खासियत

200 किलो वजनाचा सुरेख 'राम दरबार', जाणून घ्या किंमत आणि खासियत

राम दरबार

राम दरबार

राम दरबार सुमारे 40 ते 50 दिवसांत तयार करण्यात आलाय,.जो लखनऊमध्ये खूप पसंत केला जातोय. त्याचे वजन 200 किलो आहे. असा राम दरबार जगात कुठेही नाही.

  • Local18
  • Last Updated :
  • New Delhi, India

अंजली सिंह राजपूत, लखनऊ: तुम्ही अनेक राम दरबार पाहिले असतील. दर्शनही घेतले असेल. पण आज आम्ही तुम्हाला न्यूज-18 लोकलवर 13 लाख रुपयांचा राम दरबारविषयी सांगणार आहोत. जो पंच धातूपासून तयार करण्यात आलाय. जो खऱ्या सोन्यासारखे दिसतो. सुरेख असा राम दरबार सर्वांचेच लक्ष वेधून घेतोय. हे चेन्नईचे रहिवासी उमेश यांनी तयार केले असून त्यांनी अयोध्येतील सूरजकुंड गेटही बांधले आहे.

उमेश लखनऊ येथे आयोजित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिरियर डिझायनर्सच्या तीन दिवसीय प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी आले होता. यावेळी त्यांनी हा राम दरबार प्रदर्शनात ठेवला. तेव्हा तो पाहण्यासाठी लाखो लोक आले. लोकांनी या दरबारची किंमत विचारली आणि येथेच दर्शन घेतले. लोकांच्या भावना आणि त्यांची वाढती मागणी पाहून, उमेश लवकरच लखनऊमध्ये त्याचे शोरूम उघडणार आहे. जिथे लोकांना राम दरबार आणि इतर देवी-देवतांसह खऱ्या सोन्यासारखे दिसणार्‍या विविध धातूंच्या मूर्ती खरेदी करण्याची संधी मिळेल.

53 व्या वर्षी महिलेने सुरु केला बिझनेस, आज कमावते लाखो रुपये!

या राम दरबारात काय खास?

राम दरबारातील सीता, राम, लक्ष्मण यांची मूर्ती प्राचीन कलेप्रमाणे बनवण्यात आली आहे. अशा मूर्ती आता बघायला मिळत नाहीत. त्यांनी सुमारे 40 ते 50 दिवसांत राम दरबार तयार केलाय. जो लखनऊमध्ये खूप पसंत केला जातोय. त्याचे वजन 200 किलो आहे. असा राम दरबार जगात कुठेही नाही.

साडेतीन लाख रुपये किमतीचे तिरुपती

कंपनीच्या सदस्य राणीने सांगितले की, राम दरबारानंतर सर्वाधिक मागणी साडेतीन लाख रुपयांच्या तिरुपती बालाजी महाराजांना झाली आहे. हे वेगवेगळ्या धातूपासून देखील बनवले जाते. त्याचे फिनिशिंग खऱ्या सोन्यासारखे दिसते जे बऱ्याच लोकांना आकर्षित करतेय. त्याचप्रमाणे राधा कृष्ण देखील तयार केलेय जे खूपच सुंदर आहेत.

'या' टेक्नॉलॉजीने व्हाल मालमाल! मातीचा वापर न करता घराच्या छतावर उभारा बाग

First published:
top videos