• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • LPG Subsidy: पुन्हा बँक खात्यात येऊ लागली आहे एलपीजी सब्सिडी! अशाप्रकारे ऑनलाइन करा चेक

LPG Subsidy: पुन्हा बँक खात्यात येऊ लागली आहे एलपीजी सब्सिडी! अशाप्रकारे ऑनलाइन करा चेक

पुन्हा एकदा एलपीजी गॅस सिलेंडरवर (LPG Gas Cylinder Subsidy) सब्सिडी दिली जात आहे. अनुदानाचे पैसे ग्राहकांच्या खात्यावर ट्रान्सफर केले जात आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर: महागाईमुळे त्रस्त असणाऱ्या नागरिकांसाठी काहीशी दिलासादायक बातमी आहे. जीवनावश्यक वस्तू, पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel Price Today) इ. मध्ये वाढ झाल्याने अनेकांचं महिन्याचं बजेट कोलमडलं आहे. दरम्यान एलपीजी गॅस सिलेंडरचे दरही (LPG Gas Cylinder Price)  सातत्याने वाढत आहेत.  गेल्या सात वर्षांत एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती दुपटीने वाढल्या आहेत. मात्र या दरम्यान आलेली ही बातमी ग्राहकांना दिलासा देणारी आहे. पुन्हा एकदा एलपीजी गॅस सिलेंडरवर (LPG Gas Cylinder Subsidy) सब्सिडी दिली जात आहे. अनुदानाचे पैसे ग्राहकांच्या खात्यावर ट्रान्सफर केले जात आहेत. सरकार एलपीजी गॅस सिलेंडरच्या सबसिडीचे पैसे थेट ग्राहकांच्या बँक खात्यात हस्तांतरित करते आणि सरकार दरवर्षी 14.2 किलोच्या 12 सिलेंडरवर सबसिडी देते. सबसिडी तुमच्या बँक खात्यात आली आहे की नाही हे जाणून घ्या.. हे वाचा-Cryptocurrencyवर बॅन नाही!टेरर फंडिंग रोखण्यासाठी रेग्युलेट करण्याची तयारी-सूत्र अशाप्रकारे तपासा स्टेटस >> http://mylpg.in/ वर जा आणि तुमचा LPG आयडी टाका. >> तुम्ही वापरत असलेल्या OMC LPG च्या आधारावर तुम्हाला आवश्यक माहिती द्यावी लागेल. >> तुमचा 17 अंकी LPG आयडी एंटर करा आणि मोबाईल नंबर नोंदवा. >> आता कॅप्चा कोड टाका आणि proceed वर क्लिक करा >> तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. >> आता तुम्हाला तुमचा ईमेल आयडी टाकून पासवर्ड तयार करावा लागेल हे वाचा-वीज बिल भरण्यासाठी NPCI Bharat Billpay चा खास उपक्रम, कसा फायदा होईल? >> यानंतर तुम्हाला तुमच्या ईमेल आयडीवर एक लिंक मिळेल. तुमच्या मेलवर जाऊन तुम्हाला त्या लिंकवर क्लिक करावे लागेल. >> आता mylpg.in खात्यावर लॉग इन करा आणि पॉप-अप संदेशामध्ये तुमचा तपशील प्रविष्ट करा. >> याठिकाणी तुम्ही सिलेंडर बुकिंग हिस्ट्री/सबसिडी ट्रान्सफर या हे पर्याय तपासून सब्सिडीचे स्टेटस पाहू शकता. कशाप्रकारे जाणून घ्या LPG ID? तुम्हाला तुमचा LPG आयडी माहीत नसल्यास, तुमच्या 17 अंकी LPG क्रमांकाच्या खाली असलेल्या पर्यायावर क्लिक करा. तुम्हाला भारत गॅस, एचपी गॅस किंवा इंडेन यापैकी तुमच्या प्रोव्हायडरची निवड करावी लागेल आणि त्यानंतर तुमचा तपशील भरल्यावर तुम्हाला पुढील पानावर LPG आयडी मिळेल.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: