Home /News /money /

LPG Latest Price: केवळ 634 रुपयांत मिळेल घरगुती गॅस सिलेंडर, वाचा सविस्तर

LPG Latest Price: केवळ 634 रुपयांत मिळेल घरगुती गॅस सिलेंडर, वाचा सविस्तर

एलपीजी सिलेंडरच्या वाढत्या किमतींमुळे (LPG Gas Cylinder Latest Price) प्रत्येक सामान्य माणूस त्रस्त आहे. वाढत्या महागाईच्या दरम्यान, एलपीजीची गॅस सिलेंडरची सर्वाधिक किंमत सामान्यांना न परवडणारी ठरते आहे.

    नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर: एलपीजी सिलेंडरच्या वाढत्या किमतींमुळे (LPG Gas Cylinder Latest Price) प्रत्येक सामान्य माणूस त्रस्त आहे. वाढत्या महागाईच्या दरम्यान, एलपीजीची गॅस सिलेंडरची सर्वाधिक किंमत सामान्यांना न परवडणारी ठरते आहे. अशा परिस्थितीत, स्वस्त एलपीजी सिलेंडर (Cheap LPG Cylinder) कसा मिळवायचा हे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे.  घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 4 ऑक्टोबर 2021 नंतर कोणताही बदल झालेला नाही. दरम्यान यानंतरही तुम्हाला एलपीजी सिलेंडर फक्त 633.50 रुपयांना मिळू शकतो. हे सिलेंडर 14.2 किलोच्या जड सिलेंडरपेक्षा हलके असतात. किती किंमतीला मिळेल गॅस सिलेंडर? LPG च्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. मुंबईत सध्या 14.2 किलो एलपीजी सिलेंडर 899.50 रुपयांना उपलब्ध आहे. तुम्ही फक्त 633.50 रुपयांमध्ये कंपोझिट एलपीजी सिलेंडर (Composite LPG Cylinder)  मिळवू शकता. 5 किलो गॅसच्या  कंपोझिट एलपीजी सिलेंडरसाठी, तुम्हाला फक्त 502 रुपये खर्च करावे लागतील. तर 10 किलो कंपोझिट एलपीजी सिलेंडरसाठी तुम्हाला 633.50 रुपये द्यावे लागतील. कंपोझिट सिलेंडरमध्ये सामान्य घरगुती गॅस सिलेंडरपेक्षा 4 किलो गॅस कमी आहे. त्यामुळे त्याच्या किमतीही कमी आहेत. वाचा-PM मोदी आज 'गति शक्ती योजना' करणार लाँच, देशाला मिळणार ही 100 लाख कोटींची भेट 28 शहरात मिळतोय स्वस्त कंपोझिट सिलेंडर कंपोझिट सिलेंडर लोखंडाच्या सिलेंडरपेक्षा वजनाने 7 किलो हलका आहे. या एलपीजी सिलेंडरमध्ये तीन थर असतात. सध्या वापरल्या जाणाऱ्या रिकाम्या सिलेंडरचे वजन 17 किलो आहे. गॅस भरल्यावर त्याचे वजन 31 किलोपेक्षा थोडे जास्त असते. आता ग्राहकांना 10 किलोच्या कंपोझिट सिलेंडरमध्ये 10 किलो गॅसच मिळेल. पहिल्या टप्प्यात हे कंपोझिट सिलेंडर दिल्ली, बनारस, प्रयागराज, फरीदाबाद, गुरुग्राम, जयपूर, हैदराबाद, जालंधर, जमशेदपूर, पाटणा, म्हैसूर, लुधियाना, रायपूर, रांची, अहमदाबादसह 28 शहरांमध्ये उपलब्ध केले जात आहेत.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: LPG Price, Money

    पुढील बातम्या