सबसिडी नसणाऱ्या LPG गॅस सिलेंडरवर मिळवा सवलत, अशाप्रकारे करा बुकिंग

सबसिडी नसणाऱ्या LPG गॅस सिलेंडरवर मिळवा सवलत, अशाप्रकारे करा बुकिंग

एलपीजी गॅस सबसिडीचा फायदा तुम्ही घेत नसाल तरी देखील अशाप्रकारे LPG गॅसचे पैसे भरून तुम्ही त्यावर सवलत मिळवू शकता.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर: एलपीजी गॅस सिलेंडर (LPG Gas Cylinder) देशातील अनेक घरांमध्ये आज वापरले जात आहे. मोदी सरकारच्या उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गंत घराघरातील चुलींची जागा गॅसने घ्यावी यासाठी प्रयत्न सुरू आहे. दरम्यान सरकारकडून गॅस सबसिडी देखील दिली जाते. या अनुदानाचे पैसे थेट ग्राहकांच्या खात्यामध्ये जमा होतात. वर्षभरामध्ये एकूण 12 सबसिडी असणारे सिलेंडर मिळतात.अर्थात 12 पेक्षा जास्त सिलेंडर वापरल्यास तुम्हाला सबसिडी मिळणार नाही. दरम्यान सबसिडी नसणारे घरगुती गॅस सिलेंडर देखील तुम्ही चांगली सूट मिळवून खरेदी करू शकता.

तेल कंपन्या देत आहेत सूट

कोरोना काळात डिजिटल पेमेंट (Digital Payment) मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सरकार देखील डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देत आहे. दरम्यान या उद्देशासाठी तेल मार्केटिंग कंपन्या देखील ऑनलाइन पेमेंट केल्यानंतर कॅशबॅक ऑफर करत आहेत, जेणेकरून ग्राहक अधिकाधिक पेमेंट ऑनलाइन करतील. यामध्ये हिंदूस्तान पेट्रोलियम (Hindustan Petroleum), इंडियन ऑइल (Indian Oil) आणि भारत पेट्रोलियम (Bharat Petroleum) या तेल कंपन्या ग्राहकांना ऑनलाइन पेमेंट केल्यानंतर चांगली सवलत देत आहेत.

कशी मिळेल सूट?

एलपीजी गॅसच्या किंमतीवर सवलत मिळवण्यासाठी जेव्हा तुम्ही पैसे भरणार असाल त्यावेळी कॅश पेमेंट करू नका. तर त्याऐवजी ऑनलाइन पेमेंटचा पर्याय निवडा. डिजिटल पेमेंट करताना तुम्ही Paytm, PhonePe, UPI, BHIM, Google Pay, Mobikwik यांसारखे प्लॅटफॉर्म वापरू शकता. यापैकी बहुतांश प्लॅटफॉर्मवर पहिल्यांदा ऑनलाइन पद्धतीने पैसे भरताना चांगला कॅशबॅक मिळतो.

(हे वाचा-लक्ष्मी विलास बँकेपाठोपाठ महाराष्ट्रातील या बँकेवर RBI चे निर्बंध, वाचा सविस्तर)

पेटीएम (Paytm) ग्राहकांना 500 रुपयांपर्यंत कॅशबॅक देत आहे. याशिवाय तुम्ही इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डचा वापर करून केलेले पेमेंट यासांरख्या पर्यायांचा देखील वापर करू शकता. ऑनलाइन पेमेंटची खासियत म्हणजे तुम्ही घरबसल्या किंवा अगदी कुठेही असाल तरी पैसे भरू शकता. त्यामुळे गॅस सिलेंडरच्या डिलिव्हरी वेळी घरामध्ये रोख रक्कम ठेवण्याचीही गरज भासत नाही.

Published by: Janhavi Bhatkar
First published: November 18, 2020, 4:13 PM IST
Tags: gas

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading