Home /News /money /

LPG Gas Cylinder: गॅस सिलेंडरच्या बुकिंगवर 800 रुपयांपर्यंत मिळेल सवलत; असा घ्या संधीचा लाभ

LPG Gas Cylinder: गॅस सिलेंडरच्या बुकिंगवर 800 रुपयांपर्यंत मिळेल सवलत; असा घ्या संधीचा लाभ

एलपीजी गॅस सिलेंडरच्या (LPG Gas Cylinder) किंमती सातत्याने वाढत असल्याने ग्राहकांच्या खिशाला झळ बसत आहे. अशा परिस्थितीत 'पेटीएम' (paytm) तुम्हाला फक्त 9 रुपयांमध्ये गॅस सिलेंडर बुक करण्याची संधी देत ​​आहे. आपण 31 मे पर्यंत या ऑफरचा लाभ घेऊ शकता.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 07 मे: एलपीजी गॅस सिलेंडरच्या (LPG Gas Cylinder) किंमती सातत्याने वाढत असल्याने ग्राहकांच्या खिशाला झळ बसत आहे. अशा परिस्थितीत 'पेटीएम' (paytm) तुम्हाला फक्त 9 रुपयांमध्ये गॅस सिलिंडर बुक करण्याची संधी देत ​​आहे. आपण 31 मे पर्यंत या ऑफरचा लाभ घेऊ शकता. पेटीएमने या ऑफरला 'फर्स्ट टाईम' असे नाव दिले आहे. केवळ 9 रुपयांमध्ये गॅस सिलेंडर कसा बुक करू शकतो हे पाहुयात. महत्त्वाचे म्हणजे जे पेटीएम अॅपद्वारे प्रथमच गॅस बुक करीत आहेत, फक्त तेच ग्राहक या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. जेव्हा आपण गॅस बुकिंगसाठी पैसे भरू तेव्हा आपल्याला 800 रुपयांचे स्क्रॅच कार्ड मिळेल. यात तुम्हाला 10 ते 800 रुपयांचा कॅशबॅक (paytm cashback) मिळेल. ऑफर कशी मिळवायची ते जाणून घ्या - >> तुमच्या फोनमध्ये पेटीएम अ‌ॅप नसेल तर प्रथम डाऊनलोड करा. >> त्यानंतर पेटीएम वर जा आणि 'Show more' वर क्लिक करा. >> आता 'recharge and pay bills' वर जा. >> आता 'book a cylinder' पर्यायावर क्लीक करा. हे वाचा-दररोज करा 150 रुपयांची गुंतवणूक, मुदतीनंतर मिळेल दुप्पट रक्कम >> भारत गॅस, एचपी गॅस किंवा इंडेनमधून आपला गॅस प्रदाता निवडा. >> नोंदणीकृत मोबाइल क्रमांक किंवा तुमचा एलपीजी आयडी (LPG ID) प्रविष्ट करा. >> यानंतर तुम्हाला पेमेंटचा पर्याय दिसेल. >> आता पैसे पेड करण्यापूर्वी हा 'FIRSTLPG' प्रोमो कोड तिथे टाका. केवळ पेटीएमच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध होईल 800 रुपयांपर्यंतच्या या कॅशबॅकचा लाभ पेटीएम अ‍ॅपद्वारे प्रथमच एलपीजी गॅस सिलेंडर बुक करणार्‍या ग्राहकांना घेता येणार आहे. ही कॅशबॅक ऑफर 31 मे 2021 रोजी पर्यंत लागू होत आहे. बुकिंगनंतर 24 तासांच्या आत तुम्हाला कॅशबॅक स्क्रॅच कार्ड मिळेल. हे स्क्रॅच कार्ड 7 दिवसांच्या आत वापरावे लागेल. हे वाचा-RBI कडून कर्ज पुनर्रचना योजनेची घोषणा; लहान व्यावसायिक, कर्जदारांना मोठा दिलासा यापूर्वीही ग्राहकांना अशा ऑफर्स मिळाल्या आहेत पेटीएम प्रथमच आपल्या ग्राहकांना अशी ऑफर देत आहे असे नाही. यापूर्वीही पेटीएमने एलपीजी गॅस बुकिंगवर ऑफर देण्याचे काम केले आहे. यापूर्वीही कंपनीच्या बुकिंगवर ग्राहकांना 800 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळाला आहे. यावेळी पेटीएमकडून एलपीजी गॅस सिलिंडर ग्राहकांना 809 रुपयांमध्ये मिळणाऱ्या सिलेंडरवर 800 रुपयांपर्यंत कॅशबॅक देण्यात येत आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Gas, LPG Price, Paytm offers

    पुढील बातम्या