मराठी बातम्या /बातम्या /मनी /LPG Cylinder मुळे अपघात झाल्यास मिळेल 50 लाखांची नुकसान भरपाई, वाचा कशाप्रकारे कराल क्लेम

LPG Cylinder मुळे अपघात झाल्यास मिळेल 50 लाखांची नुकसान भरपाई, वाचा कशाप्रकारे कराल क्लेम

एलपीजी सिलेंडरचा स्फोट (LPG cylinder explosion) झाला किंवा गॅस गळतीमुळे (Gas leak) अपघात झाला तर ग्राहक म्हणून तुमचे अधिकार काय आहेत? जाणून घ्या सविस्तर

एलपीजी सिलेंडरचा स्फोट (LPG cylinder explosion) झाला किंवा गॅस गळतीमुळे (Gas leak) अपघात झाला तर ग्राहक म्हणून तुमचे अधिकार काय आहेत? जाणून घ्या सविस्तर

एलपीजी सिलेंडरचा स्फोट (LPG cylinder explosion) झाला किंवा गॅस गळतीमुळे (Gas leak) अपघात झाला तर ग्राहक म्हणून तुमचे अधिकार काय आहेत? जाणून घ्या सविस्तर

  नवी दिल्ली, 24 डिसेंबर: LPG गॅस सिलेंडर वापरताना काळजीपूर्वक वापरावा, अशा सुचना वारंवार दिल्या जातात. कारण, सिलेंडरमधील (LPG Cylinder Blast) छोटासा बिघाड देखील मोठ्या अपघातास कारणीभूत ठरू शकतो. एलपीजी वापरताना कोणती खबरदारी घेतली पाहिजे आणि कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडल्यास काय केले पाहिजे, हे जाणून तर घेणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आपल्याला हे देखील माहिती पाहिजे की, जर एलपीजी सिलेंडरचा स्फोट (LPG cylinder explosion) झाला किंवा गॅस गळतीमुळे (Gas leak) अपघात झाला तर ग्राहक म्हणून तुमचे अधिकार काय आहेत.

  50 लाख रुपयांपर्यंतचा इन्शुरन्स

  एलपीजी म्हणजेच घरगुती गॅस कनेक्शन घेतल्यावर पेट्रोलियम कंपन्या (Petroleum companies) ग्राहकाला पर्सनल अॅक्सिडेंट कव्हर (Personal accident cover) देतात. एलपीजी सिलेंडरमधून गॅस गळती किंवा स्फोट होऊन अपघात झाल्यास 50 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत मिळू शकते. या इन्शुरन्ससाठी पेट्रोलियम कंपन्यांची विमा कंपन्यांशी भागीदारी असते. डिलिव्हरीपूर्वी सिलेंडर व्यवस्थित आहे की नाही हे तपासण्याची जबाबदारी डीलरची असते. ग्राहकाच्या घरी एलपीजी सिलेंडरमुळे झालेल्या अपघातात जीवित आणि मालमत्तेच्या हानीसाठी नुकसान भरपाई (Compensation) देण्याची जबाबदारी कंपनीची असते. अपघातात ग्राहकाच्या मालमत्तेचं आणि घराचे नुकसान झाल्यास, 2 लाख रुपयांपर्यंतचा इन्शुरन्स क्लेम करता येतो.

  हे वाचा-Income Tax च्या कक्षेत येत नसाल तरीही दाखल करा ITR, राहाल फायद्यात

  जाणून घ्या गॅस सिलेंडरवर 50 लाखांचा क्लेम कसा मिळवायचा

  अपघातानंतर इन्शुरन्स क्लेम करण्याची प्रक्रिया मायएलपीजी.इन (http://mylpg.in) या अधिकृत वेबसाइटवर दिलेली आहे. वेबसाइटनुसार, ग्राहकाला मिळालेल्या एलपीजी कनेक्शनच्या सिलिंडरमुळं घरात एखादी दुर्घटना घडली, तर ती व्यक्ती 50 लाख रुपयांपर्यंतच्या विम्यासाठी पात्र ठरते.

  1. गॅसमुळे अपघात झाल्यास जास्तीत जास्त 50 लाख रुपये नुकसान भरपाई मिळू शकते. अपघातात जखमी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला जास्तीत जास्त 10 लाख रुपयांची भरपाई दिली जाऊ शकते.

  2. एलपीजी सिलेंडरचा इन्शुरन्स कव्हर मिळविण्यासाठी, अपघात झाल्यानंतर ग्राहकानं तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला आणि त्याच्या एलपीजी वितरकाला माहिती दिली पाहिजे.

  3. इंडियन ऑइल, एचपीसी (HPC) आणि पीबीसी (BPC) सारख्या पीएसयु तेल विपणन कंपन्यांच्या वितरकांना व्यक्ती आणि मालमत्तांसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स कव्हरसह अपघातांसाठी विमा पॉलिसी घ्यावी लागते.

  हे वाचा-9 महिन्यात दिला 5000 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न, तुमच्याकडे आहे का हा स्टॉक?

  4. ही पॉलिसी कुठल्याही ग्राहकाच्या नावे अशी नसते. मात्र, एलपीजीचा प्रत्येक ग्राहक या पॉलिसीच्या कव्हरमध्ये येतो. विशेष म्हणजे यासाठी कुठलाही प्रीमियम भरावा लागत नाही.

  5. अपघात झाल्यास एफआयआरची प्रत, जखमी व्यक्तींचे मेडिकल बिल्स आणि मृत्यू झाल्यास पोस्टमॉर्टम रिपोर्टची प्रत व मृत्यू प्रमाणपत्र (Death certificate) सांभाळून ठेवा.

  गॅस सिलेंडरमुळं अपघात झाल्यास सर्वप्रथम पोलिसांत तक्रार नोंदवावी लागते. यानंतर संबंधित क्षेत्रीय कार्यालय अपघाताच्या कारणांची शहानिशा करते. एलपीजीमुळं अपघात असल्यास, एलपीजी वितरक एजन्सी किंवा विमा कंपनीच्या स्थानिक कार्यालयाला त्याबद्दल माहिती दिली जाते. यानंतर संबंधित विमा कंपनीकडे इन्शुरन्सचा क्लेम दाखल केला जातो. ग्राहकाला क्लेमचा अर्ज करण्याची किंवा विमा कंपनीशी थेट संपर्क साधण्याची गरज पडत नाही.

  एलपीजी गॅसमुळं अपघात झाल्यास नुकसान भरपाई उपलब्ध आहे, ही बाब फारच कमी ग्राहकांना माहिती आहे. त्यामुळं तुमच्या आसपास किंवा माहितीतील व्यक्तींच्या घरी जर असे अपघात झाले तर त्यांना या सुविधेचा लाभ घेण्याचा सल्ला दिला पाहिजे.

  First published:

  Tags: LPG Price