Home /News /money /

LPG Price Hike: महागाईचा चटका; सिलेंडरच्या दरात विक्रमी वाढ, किंमत पोहोचली 1000 रुपयांच्या पार, पाहा नवे दर

LPG Price Hike: महागाईचा चटका; सिलेंडरच्या दरात विक्रमी वाढ, किंमत पोहोचली 1000 रुपयांच्या पार, पाहा नवे दर

LPG Cylinder price hike: महागाईने हैराण झालेल्या सर्वसामान्यांना आणखी एक झटका बसला आहे. कारण सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे.

    नवी दिल्ली, 19 मे : महागाईमुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं असतानाच आता पुन्हा एक झटका बसला आहे. तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ (LPG Cylinder price hike) केली आहे. या दरवाढीमुळे आता भारतात घरगुती गॅस सिलेंडरचा दर 1000 रुपयांच्या पार (Domestic LPG Cylinder is above 1000 rupees) पोहोचला आहे. त्यासोबतच व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरातही वाढ झाली आहे. (LPG cylinders price hike check Mumbai, Delhi, Kolkata rates) सिलेंडरचा दर 1000 रुपयांच्या पुढे आज घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 3 रुपये 50 पैसे इतकी वाढ झाली आहे. त्यामुळे भारतात घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचा भाव 1000 रुपयांच्या पुढे पोहोचला आहे. या दरवाढीमुळे आजपासून 14.2 किलोग्रॅमच्या घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत दिल्ली आणि मुंबईत 1003 रुपये, कोलकात्यात 1029 रुपये, चेन्नईत 1018.5 रुपये इतका झाला आहे. या महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. यापूर्वी 7 मे रोजी सिलेंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा दरवाढ करण्यात आली आहे. वाचा : जीवनावश्यक वस्तूच्या किंमती वाढल्याने महागाई सर्वोच्च पातळीवर, मोदी सरकारच्या आकडेवारीने चिंता वाढली देशातील प्रमुख शहरांतील घरगुती LPG Cylinder ची किंमत (14.2 किलो) दिल्ली - 1003 रुपये प्रति सिलेंडर मुंबई - 1002.50 रुपये प्रति सिलेंडर कोलकाता - 1029 रुपये प्रति सिलेंडर चेन्नई - 1018.50 रुपये प्रति सिलेंडर वाचा : SBI च्या ग्राहकांना महिनाभरात दुसरा झटका; कर्जाचा EMI आणखी वाढणार व्यावसायिक एलपीजी सिलेंडरही महागला घरगुती गॅस सिलेंडरच्या दरासोबतच व्यवावसायिक गॅस सिलेंडरच्या दरातही 8 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आजपासून 19 किलो गॅस सिलेंडरचा दर दिल्लीत 2354 रुपये, कोलकात्यात 2454 रुपये, मुंबईत 2306 रुपये आणि चेन्नईत 2507 रुपये इतके मोजावे लागणार आहेत. यापूर्वी 7 मे रोजी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 10 रुपयांनी कपात करण्यात आली होती. तर 1 मे रोजी यामध्ये तब्बल 100 रुपयांची वाढ झाली होती. त्याचवेळी मार्च महिन्यात दिल्लीत 19 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत 2012 रुपये इतकी होती. 1 एप्रिलला 2253 रुपये इतका दर होता तर 1 मे रोजी हा दर 2355 रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षभरात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल 750 रुपयांनी वाढ झाली आहे. 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत किती? दिल्ली - 2354 रुपये प्रति सिलेंडर मुंबई - 2306 रुपये प्रति सिलेंडर कोलकाता - 2454 रुपये प्रति सिलेंडर चेन्नई - 2507 रुपये प्रति सिलेंडर
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: India, LPG Price

    पुढील बातम्या