मराठी बातम्या /बातम्या /मनी /खरेदीची पावती घ्या आणि 1 कोटी मिळवा, केंद्र सरकारची लॉटरी योजना

खरेदीची पावती घ्या आणि 1 कोटी मिळवा, केंद्र सरकारची लॉटरी योजना

जीएसटी अंतर्गत व्यवहार करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार लॉटरी योजना सुरू करत आहे.

जीएसटी अंतर्गत व्यवहार करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार लॉटरी योजना सुरू करत आहे.

जीएसटी अंतर्गत व्यवहार करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार लॉटरी योजना सुरू करत आहे.

नवी दिल्ली, 05 फेब्रुवारी : जीएसटी अंतर्गत व्यवहार करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार लॉटरी योजना सुरू करत आहे. ग्राहकांनी सामान खरेदी केल्यानंतर त्यावर बिल घेतल्यास जीएसटी लॉटरी योजनेंतर्गत 10 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंत बक्षिस देण्याचं जाहीर केलं आहे. ग्रहाक खरेदीची जी पावती घेतील त्याच माध्यमातून ते लॉटरी जिंकू शकतील.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जीएसटीच्या प्रत्येक बिलावर ग्राहकांना लॉटरी जिंकण्याची संधी मिळणार आहे. यामुळे ग्राहकांना कर भरण्यास प्रोत्साहन मिळेल. केंद्र सरकारने एक नवीन लॉटरी प्रणाली सुरू केली आहे. जीएसटी अंतर्गत प्रत्येक बिलावर लॉटरी जिंकता येईल. याचा ड्रॉ काढण्यात येईल.

केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गत ग्राहकांचे बिल पोर्टलवर अपलोड केले जाईल. कॉम्प्युटरच्या माध्यमातून बिलांमधून लॉटरी ड्रॉ निघेल आणि विजेता निवडण्यात येईल. विजेत्यांना त्याची माहिती सरकारमार्फत दिली जाईल. ग्राहकांनी जीएसटी बिल घ्यावे यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.

Budget 2020 : एकापेक्षा अधिक बँक खाती असल्यास तुमचे किती पैसे सुरक्षित?

अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या नेतृत्वाखालील जीएसटी परिषद लॉटरी योजनेच्या प्रस्तावावर निर्णय घेईल. परिषदेच्या बैठकीत किमान किती रकमेचे बिल लॉटरीसाठी ग्राह्य असेल हे ठरवलं जाईल. जीएसटीमध्ये ग्राहकांना कर भरण्यासाठी यामुळे प्रोत्साहन मिळेल अशी आशा सरकारला आहे.

तुम्हाला किती कर द्यावा लागेल? Tax Calculator वापरून काढा कराची रक्कम

First published:

Tags: GST