पीएफचे पैसे रिटायरमेंटपूर्वीच काढल्यास होऊ शकतं नुकसान; जाणून घ्या EPFOचा नियम

पीएफचे पैसे रिटायरमेंटपूर्वीच काढल्यास होऊ शकतं नुकसान; जाणून घ्या EPFOचा नियम

रिटायरमेंटआधीच पीएफमधले पैसे काढल्यास रिटायरमेंटवेळी मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे नोकरीदरम्यान शक्यतो पैसे न काढणं फायद्याचं ठरतं.

  • Share this:

नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर : प्रोविडेंट फंड Provident Fund अर्थात पीएफ अशी रक्कम आहे, जी सामान्यपणे रिटायरमेंटनंतर मिळते. पीएफच्या रक्कमेवर 8.5 टक्के व्याज मिळतं. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी Employees' Provident Fund Organisation रिटायरमेंटपूर्वी लग्न, मेडिकल इमरजेन्सी, शिक्षणासाठी काही भाग काढण्याची परवानगी असते.

मात्र रिटायरमेंटआधीच पीएफमधले पैसे काढल्यास रिटायरमेंटवेळी मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे नोकरीदरम्यान शक्यतो पैसे न काढणं फायद्याचं ठरतं. अनेक जण एक नोकरी बदलल्यानंतरही पीएफचे पैसे काढतात. असं केल्याने रिटायरमेंटवेळी फंड कमी येतो, ज्याचा पेन्शनवर मोठा परिणाम होतो. जर रिटायरमेंटनंतरही 3 वर्षांपर्यंत पैसे न काढल्यास त्यावर व्याज मिळतं.

दरम्यान, कोरोना काळात लॉकडाऊन झाल्यानंतर केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना Employee Provident Fund (EPF) मधून एडव्हान्स रक्कम काढण्याची परवानगी दिली होती. EPFOकडून जारी करण्यात आलेल्या आकड्यांनुसार, मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून 38,71,664 लोकांनी 44,054.72 कोटी रुपये या खात्यातून काढले आहेत. महाराष्ट्रातून 25 मार्च ते 31 ऑगस्ट आणि त्यानंतर 7,23,986 कर्मचाऱ्यांनी जवळपास 8,968.45 कोटी रुपये पीएफ अकाऊंटमधून काढले आहेत.

हे वाचा - आता PF Account मधून तुम्ही काढू शकता Advance रक्कम, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

ईपीएफओच्या बैठकीत आर्थिक वर्ष 2019-20 साठी व्याजदरांबाबत निर्णय घेण्यात आला होता. कर्मचारी भविष्य निधी EPF वर 2019-20 साठी 8.5 टक्के व्याज निश्चित करण्यात आलं. परंतु EPFO कडून केवळ 8.15 टक्के व्याज दिलं जाईल. इतर 0.35 टक्के व्याज डिसेंबर महिन्यात दिलं जाईल. ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने 5 मार्च रोजी झालेल्या बैठकीत ईपीएफवर 2019-20 साठी व्याजदर 8.50 टक्के ठेवण्याची शिफारस केली होती, जी आधीच्या 0.15 टक्के कमी आहे. ईपीएफचा हा प्रस्तावित दर 7 वर्षातील किमान दर आहे.

हे वाचा - पेन्शनबाबत सरकारचा मोठा निर्णय; 'या' अटी संपुष्टात

Published by: Karishma Bhurke
First published: October 8, 2020, 8:48 AM IST
Tags:

ताज्या बातम्या