... म्हणून भारतात डेटिंग अ‍ॅप्स होतायत लोकप्रिय

कॅज्युअल आणि सीरियस रिलेशनशिपमध्ये जाऊ इच्छिणारे डेटिंग अ‍ॅपकडे वळतात.

News18 Lokmat | Updated On: May 17, 2019 10:06 PM IST

... म्हणून भारतात डेटिंग अ‍ॅप्स होतायत लोकप्रिय

मुंबई, 17 मे : बदलत्या काळाप्रमाणे माणसांच्या गरजा बदलतात. त्यानुसार व्यवसायाचं स्वरूपही बदलतं सध्या Tinder, Bumble, Hinge, OkCupid असंख्य भारतीयांच्या आयुष्याचा एक भाग झालेत. हे आहेत  डेटिंग अ‍ॅप्स. आधीच या डेटिंग अ‍ॅप्सनी 62 कोटी 6 लाख डाॅलर्स कमाई केलीय. त्यात भारतात या अ‍ॅप्सचं मार्केट वाढतंय.

जगात अमेरिका हे डेटिंग अ‍ॅप्ससाठी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. या देशात डेटिंग अ‍ॅप कंपनींचा 796.9 मिलियम डाॅलर्स व्यवसाय आहे. एका सर्वेनुसार अमेरिका, चीन आणि इंग्लंडनंतर भारताचा चौथा नंबर लागतो.

तणावग्रस्त व्यक्तींमुळे होतेय हाॅटेल इंडस्ट्रीची वाढ, कोण किती वेळा करतं हाॅटेलिंग?

फेब्रुवारी 2019मधल्या अहवालानुसार भारतात 20 कोटी 87 लाख पेड युजर्स आहेत तर 18 कोटी 72 लाख फ्री युजर्स आहेत. 2023पर्यंत भारतात 77 मिलियन डाॅलर्सची बाजारपेठ तयार होईल, असं अहवाल सांगतो. 24 कोटी 17 लाख पेड युजर्स आणि 21 कोटी 73 लाख फ्री युजर्स असतील.

2011मध्ये केलेल्या जनगणनेनुसार भारतात 85 कोटी सिंगल आहेत. ते जोडीदार शोधतायत, पण तो त्यांना मिळत नाहीय.

Loading...

आयटी क्षेत्राचे वाईट दिवस संपले, 'या' 4 मोठ्या कंपन्यांमध्ये आहेत व्हेकन्सीज्

2017मध्ये 25 ते 34 वयोगटातले 52 टक्के भारतीय डेटिंग अ‍ॅप वापरत होते. तर  18 ते 24 वयोगटातले 30.7 टक्के डेटिंग अ‍ॅप वापरत होते. त्यातले 57.4 टक्के पुरुष आणि 42.6 टक्के स्त्रिया आहेत.

2012मध्ये टिंडर ( Tinder ) लाँच झालं. भारतात ते 2016मध्ये आलं. पश्चिमेकडे ते जास्त लोकप्रिय झालं. याचं कारण यातलं अनोखं फीचर. तुम्हाला व्यक्ती आवडली नाही तर तुम्ही डाव्या बाजूला स्वाइप करू शकता आणि आवडली तर उजव्या बाजूला स्वाइप करू शकता. 2017पर्यंत भारतात 18 कोटी 45 लाख पेड युजर्स झाले आणि 16 कोटी 5 लाख फ्री युजर्स झाले.

'या' राज्यांना बसणार वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा तडाखा

Tinder चं यश पाहता Bumble, OkCupid आणि Aisle यांनी बाजारात हातपाय पसरले. डेटिंग अ‍ॅप्सची स्पर्धा वाढली. टिंडरनं नुकतंच Tinder Lite अ‍ॅप सुरू केलंय. ज्यांच्याकडे अगदी बेसिक स्मार्टफोन्स आहेत आणि डेटा कमी आहे ते हे अॅप वापरू शकतात. भारतात Tinder वापरणारे 17 टक्के आहेत. त्याखालोखाल Happn (8 %), Truly Madly (7 %) आणि Woo (7 %) आहेत. कॅज्युअल आणि सीरियस रिलेशनशिपमध्ये जाऊ इच्छिणारे डेटिंग अॅपकडे वळतात. कधी तर नुसती मैत्री करण्यासाठीही हे अॅप वापरलं जातं.


VIDEO: पुण्यात ब्रेक फेल झाल्यानं बस थेट हॉटेलमध्येच शिरली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 17, 2019 10:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...