शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची पहिली पसंत लंडन, 'हे' आहे मुंबईचं स्थान

शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची पहिली पसंत लंडन, 'हे' आहे मुंबईचं स्थान

Global city rankings - जगभरात शिक्षणासाठी चांगली कुठली शहरं आहेत ते पाहा

  • Share this:

मुंबई, 01 ऑगस्ट : लंडननं पुन्हा एकदा बाजी मारलीय. ब्रिटनची राजधानी लंडन जगभरातल्या विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्तम शहर बनलंय. हे दुसऱ्यांदा झालंय. तर दिल्ली 113व्या स्थानावर आहे. आंतरराष्ट्रीय शिक्षण कन्सल्टन्सी क्युएस क्वाक्युरेसी सायमंडस या संस्थेनं विद्यार्थ्यांसाठी योग्य असणाऱ्या शहरांचं रँकिंग केलंय. त्यात शहरांमधल्या युनिव्हर्सिटींची संख्या, जीवनाची गुणवत्ता, पदवीनंतर शिक्षणाची संधी, विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्यात.

या यादीत भारतातल्या विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्तम शहर बंगळुरू आहे. ते 81व्या स्थानावर आहे. त्यानंतर मुंबई ( 85 ), दिल्ली ( 113 ) आणि चेन्नई ( 115 ) ही शहरं येतात. बंगळुरूला मिळणाऱ्या रँकिंगमागे इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स आणि सायन्स आणि इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट ही कारणं आहेत.

घर खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर! HDFC नं कमी केले व्याजदर, 'इतकं' स्वस्त EMI

याबद्दल बोलताना लंडनचे महापौर  सादिक खान म्हणाले, लंडनला जगातल्या सर्वोत्तम शहरांचा दर्जा मिळालाय. ही विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी आहे. लंडनमध्ये जगातल्या सर्वोत्तम शैक्षणिक संस्था आहेत.

आता 8वा वेतन आयोग नाही, 'या' पद्धतीनं वाढणार पगार

क्युएसनं सांगितलं की लंडनमध्ये टाॅप युनिव्हर्सिटींची संख्या जास्त आहे. तिथे जगातल्या अनेक भागांतून विद्यार्थी येतात. म्हणूनच लंडन टाॅप शहर झालंय.

टोकियो दुसऱ्या स्थानावर

या यादीत लंडननंतर जपानचं टोकियो दुसऱ्या आणि ऑस्ट्रेलियाचं मेलबर्न तिसऱ्या स्थानावर आहे. लंडनमध्ये भारतातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 2017-18मध्ये 20 टक्के वाढली होती. 2016-17मध्ये विद्यार्थ्यांची संख्या 4545 होती. ती आता 2017-2018मध्ये वाढून 5455 झालीय.

लवकरच तुमच्या हातात असेल 20 रुपयांची नवी नोट, 'ही' असेल खासीयत

विविध प्रकारचं शिक्षण, आजूबाजूचं सुरक्षित वातावरण, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या संधी या सगळ्याचा विचार रँकिंग देताना केला गेलाय.

मगर आली रस्त्यावर, सांगलीतला थरकाप उडवणार VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: education
First Published: Aug 1, 2019 05:14 PM IST

ताज्या बातम्या