VIDEO : लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर, नव्या रुपात येणार मेमू ट्रेन

VIDEO : लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर, नव्या रुपात येणार मेमू ट्रेन

प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी मेमू ट्रेन निर्माण केली आहे. या ट्रेनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि T-18 ट्रेनप्रमाणे सर्व सुविधा असणार आहेत. पाहा कशी असेल नवी मेमू ट्रेन

  • Share this:

मुंबई, 24 डिसेंबर : दररोज लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांना होणारा त्रास, रोज उदभवणाऱ्या समस्या आणि गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासन सतत कार्यरत असतं. पण वाढत्या लोकसंख्येमुळे आणि लोकांचं प्रचंड शहरांमध्ये स्थलांतर झाल्यामुळे गर्दीचं प्रमाण वाढत चाललं आहे. रेल्वे प्रशासनाच्या उत्तम कामगिरी यंदाच्या पावसामध्ये लोकल बंद पडण्याच्या सुविधा उदभवल्या नाही.

रेल्वे प्रशासनाने नवी बंबरडिअर रेल्वे सुविधा आणल्यामुळे अनेक समस्या दूर झाल्या. नव्या आलेल्या लोकल सेवेमुळे यंदाच्या पावसात मुंबईची लाईफ लाईन ठप्प झाली नाही. पण तरीही वाढती लोकसंख्येमुळे गर्दीचं प्रमाण प्रचंड वाढत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आता रेल्वे प्रशासनाने नवी लोकल ट्रेन अस्तित्वात आणायचं ठरवलं आहे.

लांब पल्याच्या गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. त्यासाठी आता नव्या रुपात मेमू ट्रेन येणार आहे. या मेमू ट्रेनचं काम चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये सुरु आहे. या ट्रेनमुळे प्रवाशांना टी-18 ट्रेनसारखी सुविधा मिळणार आहे.

नव्यानं येणारी ही मोमू ट्रेन प्रति एका तासात 130 किलोमीटर पल्ला गाठू शकते. मेमू (MEMU) म्हणजेच Mainline Electric Multiple Unit शहरांमध्ये लांब पल्ला जलद गाठण्यासाठी याचा वापर होणार आहे.

नव्या लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांची संख्या नऊपट जास्त असणार आहे. यामध्ये एकूण 2818 प्रवाशी प्रवास करू शकणार आहेत. या ट्रेनमध्ये दोन मोटरमॅन आणि सहा टीसी असणार आहेत.

या नव्या मेमू ट्रेनची माहिती  रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

First published: December 24, 2018, 5:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading