Home /News /money /

Indian Bank ग्राहकांना मोठा झटका, MCLR 0.15 टक्क्यांनी वाढवल्याने कर्ज महागणार

Indian Bank ग्राहकांना मोठा झटका, MCLR 0.15 टक्क्यांनी वाढवल्याने कर्ज महागणार

MCLR वाढल्याने मुदत कर्जावरील EMI वाढण्याची अपेक्षा आहे. बहुतांश ग्राहक कर्जे मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट आधारित असतात.

    मुंबई, 1 जुलै : सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन बँकेने (Indian Bank) आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. आता बँकेकडून कर्ज घेणे महाग होणार आहे. बँकेने म्हटले आहे की त्यांनी रविवारपासून मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) 0.15 टक्क्यांनी वाढवला आहे. एक वर्षाचा बेंचमार्क MCLR 7.40 टक्क्यांवरून 7.55 टक्के करण्यात आला आहे. बहुतांश ग्राहक कर्जांचे व्याजदर याच आधारावर निश्चित केले जातात. नियामक फाइलिंगमध्ये, बँकेने म्हटले आहे की एक दिवस ते सहा महिन्यांच्या कर्जावर MCLR समान प्रमाणात 6.75 वरून 7.40 टक्के वाढवला आहे. तुमचा EMI वाढेल MCLR वाढल्याने मुदत कर्जावरील EMI वाढण्याची अपेक्षा आहे. बहुतांश ग्राहक कर्जे मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट आधारित असतात. अशा परिस्थितीत, MCLR वाढल्यामुळे वैयक्तिक कर्ज, वाहन आणि गृह कर्ज (Personal, car laon, Home loan) महाग होऊ शकते. LPG Price: सिलेंडरच्या दरात आजपासून मोठी कपात; नवीन दरानुसार किती स्वस्त मिळेल सिलेंडर MCLR म्हणजे काय? MCLR ही भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने विकसित केलेली एक पद्धत आहे ज्याच्या आधारावर बँका कर्जासाठी व्याजदर ठरवतात. RBI ने 1 एप्रिल 2016 पासून देशात MCLR सुरू केला. त्यापूर्वी सर्व बँका बेस रेटच्या आधारे ग्राहकांसाठी व्याजदर निश्चित करत असत. एप्रिल 2016 पासून बँका बेस रेटच्या जागी MCLR वापरत आहेत. आता बँकांद्वारे MCLR मध्ये कोणतीही वाढ किंवा कपात नवीन आणि विद्यमान कर्जदारांवर देखील परिणाम करते. Petrol-Diesel Prices: कच्च्या तेलाच्या दरात घसरण, पेट्रोल-डिझेलच्या दरांवर काय परिणाम? काही दिवसांपूर्वीच भारतीय रिझर्व्ह बँकेकडून नवीन रेपो दर जाहीर करण्यात आला. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 50 बेसिस पॉईंटने वाढ केली होती. आरबीआयच्या नव्या पतधोरणानुसार आता रेपो दर 4.90 टक्के इतका झाला आहे. त्यामुळे कर्ज महागणार असून ईएमआयदेखील वाढले आहेत.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Bank details, Home Loan, Money

    पुढील बातम्या