जगातल्या टाॅप CEO मध्ये मुकेश अंबानी, 'या' 10 भारतीयांचाही समावेश

जगातल्या टाॅप CEO मध्ये मुकेश अंबानी, 'या' 10 भारतीयांचाही समावेश

Ceo, Mukesh Ambani - जगातल्या टाॅप CEOच्या यादीत मुकेश अंबानी आहेत. याशिवाय कोण कोण आहेत ते पाहा

  • Share this:

मुंबई, 30 जुलै : जगातल्या सर्वोत्तम मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या (CEO) यादीत सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी, इंडियन ऑइल काॅर्पोरेशन ( IOC )चे अध्यक्ष संजीव सिंह आणि ओएनजीसी ( ONGC )चे प्रमुख शशी शंकर यांचा समावेश आहे. सीईओ वर्ल्ड पुस्तिकेनं 2019मधल्या जगातल्या सर्वात प्रभावशाली CEO ची यादी दिलीय. यात 10 भारतीय CEO आहेत.

मुकेश अंबानी 49व्या स्थानावर

आर्सेलमित्तलचे अध्यक्ष आणि CEO लक्ष्मी निवास मित्तल सर्वात वरच्या स्थानावर आहेत. त्यांच्या कंपनीला लक्झमबर्गच्या कंपनीच्या रूपात दाखवलंय. जगभरातले 121 सीईओ या यादीत आहेत. त्यात रिलायन्स इंडस्ट्रीजचे (RIL) अध्यक्ष मुकेश अंबानी 49व्या स्थानावर आहेत. आयओसीचे सिंह 69व्या आणि ओएनजीसीचे चेअरमन शशी शंकर 77व्या स्थानावर आहेत.

पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त, 'या' आहेत आजच्या किमती

पवार Vs फडणवीस, फोडाफोडीच्या राजकारणानंतर एकाच मंचावर रंगणार जुगलबंदी

या यादीत जे इतर भारतीय CEO आहेत त्यात SBIचे रजनीश कुमार ( 83व्या ), टाटा मोटर्सचे गुएंटर बटशेक (89व्या), BPCLचे चेअरमन डी.राजकुमार (94व्या), राजेश एक्सपोर्टसचे राजेश मेहता (99व्या), टाटा कन्सल्टन्सी सर्विसेजचे राजेश गोपिनाथन आणि विप्रोचे आबिदअली जेड निमचवाला ( 118व्या ) यांचा समावेश आहे.

तारीख ठरली! साताऱ्याचे 'राजे' लवकरच भाजपमध्ये, 'हे' 3 आमदारही सोडणार आघाडीची साथ

वाॅलमार्टचे CEO पहिल्या स्थानावर

या यादीत वाॅलमार्टचे सीईओ डग्लस मॅकमीलन पहिल्या स्थानावर आहेत. त्यानंतर राॅयल डच शेलचे CEO बेन वान ब्युंडर आणि आर्सेलरमित्तलचे लक्ष्मी मित्तल यांचा नंबर लागतो. सौदी अमेरिकेचे सीईओ अमीन एच नासिर चौथ्या नंबरवर आहेत. बीपीचे बाॅब डुडले 5व्या, एक्साॅनमोबिलचे सीईओ डेरन वुड्स सहाव्या, फाॅक्सवॅगनचे सीईओ हरबर्ट डिएस 7व्या आणि टोयाटोचे एकियो टोयोदा 8व्या स्थानावर आहेत. अॅपलचे CEO टिम कुक या यादीत नवव्या स्थानावर आहेत. बर्कशायल हॅथवेचे सीईओ वाॅरेन बफे 10व्या स्थानावर आहेत.

VIDEO: पर्लकोटा नदीच्या पुरात वाढ, 70पेक्षा जास्त गावांचा संपर्क तुटला

First published: July 30, 2019, 12:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading