मराठी बातम्या /बातम्या /मनी /

लिपस्टिक आणि डेटिंग साइट्स देताहेत मंदीचे संकेत, आकड्यांवरुन समजेल नेमकं गणित

लिपस्टिक आणि डेटिंग साइट्स देताहेत मंदीचे संकेत, आकड्यांवरुन समजेल नेमकं गणित

लिपस्टिक

लिपस्टिक

अलीकडे जागतिक मंदीच्या चर्चांना उधाण आलंय. जगभरातील आर्थिक तज्ज्ञ मंदीबाबत अशुभ संकेत देत आहेत.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई, 27 सप्टेंबर-  अलीकडे जागतिक मंदीच्या चर्चांना उधाण आलंय. जगभरातील आर्थिक तज्ज्ञ मंदीबाबत अशुभ संकेत देत आहेत. एस अँड पी ग्लोबल मार्केट इंटेलिजन्सच्या अहवालांनुसार, जागतिक सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) या वर्षी 2.8% पर्यंत कमी होऊ शकतं, तेच 2023 मध्ये आणखी घसरणीसह 2 टक्क्यांपर्यंत खाली येईल. जागतिक बँकेनेही अलीकडेच सध्याची जागतिक अर्थव्यवस्था कशी आहे, यावर प्रकाश टाकला होता. 1970 च्या दशकानंतर जग सर्वांत मोठी मंदी अनुभवत आहे, असं निरीक्षण जागतिक बँकेने नोंदवलं आहे. या वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा रशियाने युक्रेनवर आक्रमण केलं, तेव्हापासून जग गंभीर पुरवठा समस्येचा सामना करतंय. यासोबतच अनेक देशांना ऊर्जेच्या वाढत्या किमतींमुळे इतर समस्यांना तोंड द्यावं लागत आहे.

ऊर्जेचा खर्च वाढल्याने उत्पादनांच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. परिणामी, चलनवाढीचा दर सगळीकडे विक्रमी उच्चांकावर पोहोचला आहे. सामान्य नियमांनुसार, सलग दोन तिमाही आर्थिक घसरण मंदी दर्शवते. मंदीच्या काळात पैशांचं व्यवस्थापन करणं अवघड असतं. "या कालावधीत सर्वसमावेशक फायनान्शिअल मॅनेजमेंटमध्ये कमाई, बचत, खर्च, गुंतवणूक, कर्ज घेणं प्रॉपर्टी प्लॅनची काळजी घेणं गरजेचं आहे," असं अनुभवी आर्थिक नियोजक संजीव दावर यांनी सांगितलं.

तरुण इक्विटीमध्ये करू शकतात गुंतवणूक-

“प्रॉपर्टी डिस्ट्रिब्युशन रिसेशन प्रूफ हा प्रत्येकाच्या आर्थिक जीवनाचा महत्त्वाचा भाग असतो. याचा अर्थ तुमची इक्विटी, डेट, रिअल इस्टेट आणि सोन्याची गुंतवणूक विभाजित करणं असा होता. या डिस्ट्रिब्युशनचं प्रमाण गुंतवणूकदाराच्या आयुष्याच्या टप्प्यानुसार आणि जीवनाच्या उद्दिष्टांनुसार वेगवेगळं असू शकतं. तरुण गुंतवणूकदाराची जोखीम सहन करण्याची क्षमता जास्त असते, त्यामुळे त्यांनी इक्विटीमध्ये अधिक गुंतवणूक करणं अनुकूल असतं. याउलट, निवृत्त व्यक्तीसाठी भांडवल संवर्धन हे प्रमुख उद्दिष्ट असतं,” असं दावर म्हणाले.

लिपस्टिकच्या विक्रीत 48 % वाढ-

आपण दररोज वापरत असलेल्या वस्तूंवरून मंदीच्या प्रभावाचा अंदाज कसा बांधता येऊ शकतो? याबद्दलही त्यांनी सांगितलं. लिपस्टिक, कचरा आणि डेटिंग साइट्स तुम्हाला मंदीच्या प्रभावाबद्दल विचार करण्यास भाग पाडू शकतात, परंतु ते निर्णायक नसतं. एनपीडी डेटानुसार, 2022 च्या पहिल्या तिमाहीत लिपस्टिकच्या विक्रीत 48% वाढ झाली आहे. सर्वसाधारणपणे, 2022 च्या पहिल्या 6 महिन्यांत मेकअपच्या सामानाच्या विक्रीत 20% वाढ झाली आहे.

तज्ज्ञ याला अचूक संकेत मानत नाहीत

जग डॉट-कॉम बबल प्रतिकूल आर्थिक परिणामाशी संघर्ष करत होतं. पण फर्मने आपल्या लिपस्टिकच्या विक्रीत मोठी वाढ पाहिली. अधिक उत्पादन आणि वापर म्हणजे अधिक कचरा निर्मिती. अर्थव्यवस्था मंदावल्याने, लोक कमी खर्च करतील आणि त्यामुळे कमी कचरा निर्माण करतील असा सर्वसाधारण समज आहे. परंतु काही तज्ज्ञ हे संकेत अचूक मानत नाहीत.

(हे वाचा:नवरात्रीच्या पहिल्या दिवशी राजधानीत सोनं महागलं! मुंबईतील दरात मात्र.. )

डेटिंग साइटवरील युजर्सच्या संख्येत वाढ

नवीन डेट इंडेक्स हाही एक संकेत आहे. सेन्सर टॉवरच्या डेटानुसार टिंडर, बंबल आणि हिंजसारख्या प्रमुख डेटिंग आणि नेटवर्किंग साइटवरील मासिक सक्रिय युजर्स 3 वर्षांपूर्वीच्या याच महिन्यातील वाढीच्या तुलनेत जानेवारी 2022 मध्ये 17% वाढले. विशेष म्हणजे गेल्या वर्षी या 3 अॅप्सच्या डाउनलोडची संख्या 106.4 मिलियनवर पोहोचली होती.

First published:

Tags: Lifestyle, Money