S M L

पॅन-आधार लिंक करण्याची तारीख 'या' लोकांसाठी वाढवली नाही, होऊ शकतं नुकसान

केंद्र सरकारनं पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्याची डेडलाइन पुन्हा 6 महिन्यांनी वाढवलीय. आता ती आहे 30 सप्टेंबर 2019.

Updated On: Apr 9, 2019 07:10 PM IST

पॅन-आधार लिंक करण्याची तारीख 'या' लोकांसाठी वाढवली नाही, होऊ शकतं नुकसान

मुंबई, 09 एप्रिल : केंद्र सरकारनं पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्याची डेडलाइन पुन्हा 6 महिन्यांनी वाढवलीय. आता ती आहे 30 सप्टेंबर 2019. पण डेडलाइन वाढवल्यामुळे सगळ्यांना सुटकेचा नि:श्वास टाकता येणार नाही. जे करदाते 31 जुलै 2019पर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न भरणार आहेत, त्यांना PAN आणि आधार लवकरच लिंक करावं लागणार. म्हणजे 31 जुलैआधी लिंक करावी लागतीलच.

सहाव्यांदा डेडलाइन वाढवली - सरकारनं पॅन आणि आधार लिंक करायची डेडलाइन सहाव्यांदा वाढवलीय.गेल्या वर्षी ही डेडलाइन होती 31 मार्च. नंतर ती तारीख बदलत बदलत आता 30 सप्टेंबर 2019 झाली.

देशात काळा पैशाला लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारने कार्यक्रम आखला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत काळा पैशाची चोरी थांबण्यासाठी पॅन आणि आधार कार्ड लिंक करणं अनिवार्य केलं आहे. शासकीय योजना, सबसिडी आणि इतर योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य आहे.


IT रिटर्न भरताना आधार कार्ड आणि पॅन कार्ड दोन्हींची गरज लागते. दोन्ही कार्ड लिंक असणं गरजेचं आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबरपर्यंत 41 कोटी पॅन कार्ड दिली गेली. त्यात 21 कोटींपेक्षा जास्त लोकांनी ती आधारशी लिंक केली. आयकर कायदाचं कलम 139AA अनुसार पॅन असलेल्या प्रत्येक व्यक्तीला आधार कार्ड घेता येईल.

तुमच्या आधार कार्डात एखादी चूक झाली असेल, तर ती दुरुस्त करायची तुमच्याकडे एकच संधी आहे. आम्ही सांगतोय डेट आॅफ बर्थची. तुमच्या आधारकार्डावरची तुमची जन्मतारीख चुकली असेल तर ती एकदाच दुरुस्त होऊ शकते. याची माहिती आधार कार्ड इश्यू करणाऱ्या UIDAIनं दिली आहे. आधारकार्ड एकदाच अपडेट करता येतं.

Loading...

आधारकार्डात फक्त घरचा पत्ता सोडला तर बाकी सगळ्या गोष्टी अपडेट करण्यासाठी तुम्हाला आधार केंद्रावर जावं लागेल. सोबत जन्माचा दाखला म्हणजे बर्थ सर्टिफिकेट ठेवायलाच हवं.


VIDEO : एअर स्ट्राईकचा निर्णय सर्वांना विश्वासात घेऊन घेतला - मोदी


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 9, 2019 07:10 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close