मराठी बातम्या /बातम्या /मनी /दररोज 233 रुपयांची बचत करून मिळवा 17 लाख, मुलांचं लग्न-शिक्षणासाठी फायद्याची ठरेली ही LIC Policy

दररोज 233 रुपयांची बचत करून मिळवा 17 लाख, मुलांचं लग्न-शिक्षणासाठी फायद्याची ठरेली ही LIC Policy

एलआयसीच्या जीवन लाभ (LIC Jeevan Labh) या योजनेच्या माध्यमातून दररोज 233 रुपये गुंतवून काही वर्षांत 17 लाख रुपये उभे करता येऊ शकतात. या योजनेबद्दल अधिक माहिती पाहू या.

एलआयसीच्या जीवन लाभ (LIC Jeevan Labh) या योजनेच्या माध्यमातून दररोज 233 रुपये गुंतवून काही वर्षांत 17 लाख रुपये उभे करता येऊ शकतात. या योजनेबद्दल अधिक माहिती पाहू या.

एलआयसीच्या जीवन लाभ (LIC Jeevan Labh) या योजनेच्या माध्यमातून दररोज 233 रुपये गुंतवून काही वर्षांत 17 लाख रुपये उभे करता येऊ शकतात. या योजनेबद्दल अधिक माहिती पाहू या.

    नवी दिल्ली, 28 मे: लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (Life Insurance Corporation) अर्थात LIC ने ग्राहकांचं वर्तमान आणि भविष्य सुरक्षित राखण्यासाठी कायमच विशेष योजना आणल्या आहेत. एलआयसीच्या योजना वेगवेगळ्या वर्गांच्या गरजा लक्षात घेऊन तयार केलेल्या असतात. एलआयसीच्या जीवन लाभ (LIC Jeevan Labh) या योजनेच्या माध्यमातून दररोज 233 रुपये गुंतवून काही वर्षांत 17 लाख रुपये उभे करता येऊ शकतात. या योजनेबद्दल अधिक माहिती पाहू या.

    मुलांचं शिक्षण-लग्नासाठी उभा करा फंड

    एलआयसीच्या या पॉलिसीचं नाव जीवन लाभ (936) असं असून, ती एक नॉन-लिंक्ड पॉलिसी (Non-Linked Policy) आहे. म्हणजेच या पॉलिसीचा शेअर मार्केटच्या चढ-उतारांशी काहीही संबंध नाही. हा एक लिमिटेड प्रीमियम प्लॅन असून, मुलांचे विवाह, उच्च शिक्षण, मालमत्ता खरेदी आदी उद्देश साध्य करण्यासाठी मदत व्हावी या उद्देशाने कंपनीने हा प्लॅन सादर केला आहे.

    काय आहेत महत्त्वाचे मुद्दे?

    - जीवन लाभ ही पॉलिसी नफा आणि सुरक्षितता या दोन्हीही बाबी देते.

    - आठ ते 59 वर्षांपर्यंतच्या व्यक्तींसाठी ही पॉलिसी घेता येऊ शकते.

    हे वाचा-LIC Recruitment 2021: नोकरीची सुवर्णसंधी! वर्षाला मिळेल 9 लाखांपर्यंत पगार

    - 16 ते 25 वर्षांच्या मुदतीसाठी (Term) ही पॉलिसी घेता येऊ शकते.

    - कमीत कमी दोन लाख रुपयांचा विमा (Sum Assured) या पॉलिसीद्वारे काढावा लागतो, मात्र कमाल रकमेची मर्यादा नाही.

    - या पॉलिसीचे हप्ते तीन वर्षांपर्यंत भरले, तर त्यानंतर पॉलिसीवर कर्ज (Loan on Policy) घेण्याची सुविधा उपलब्ध आहे.

    - या पॉलिसीच्या हप्त्यांवर करसवलत मिळते. तसंच पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास वारसाला (Nominee) विम्याची रक्कम, तसंच बोनस मिळतो.

    पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास..

    पॉलिसीचा कालावधी सुरू असताना पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला आणि त्याने मृत्यू होइपर्यंतचे सर्व हप्ते नियमितपणे भरले असतील, तर त्याच्या मृत्यूनंतर नॉमिनीला विम्याची रक्कम, सिंपल रिव्हर्सनरी बोनस आणि फायनल अॅडिशन बोनस (काही असल्यास) दिला जातो. म्हणजेच नॉमिनीला विमा रकमेपेक्षा जास्त रक्कम मिळते, असा याचा अर्थ.

    हे वाचा-5 वर्षांत 3 लाखांचं मूल्य चौपटीनं वाढलं, अशी फायदेशीर गुंतवणूक कुठे कराल?

    एक उदाहरण पाहून या पॉलिसीविषयी जाणून घेऊ या. एखाद्या व्यक्तीने 23व्या वर्षी 16 वर्षांच्या मुदतीची 10 लाख रुपये सम अॅश्युअर्ड असलेली पॉलिसी घेतली, तर त्याला 10 वर्षांपर्यंत दररोज 233 रुपये जमा करणं गरजेचं आहे. अर्थात ही रक्कम तुम्ही मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक भरू शकता. या 10 वर्षांत तो एकूण 8 लाख 55 हजार 107 रुपये हप्ता स्वरूपात भरेल. पॉलिसी मॅच्युअर (Maturity) झाल्यानंतर म्हणजे त्या व्यक्तीच्या वयाच्या 39व्या वर्षी 17 लाख 13 हजार रुपये त्या व्यक्तीला मिळतील.

    First published:
    top videos

      Tags: Investment, LIC