LIC ची खास पाॅलिसी, 15 रुपये खर्च करून होईल लाखो रुपयांचा फायदा

LIC ची खास पाॅलिसी, 15 रुपये खर्च करून होईल लाखो रुपयांचा फायदा

LIC, Childrens Money Back Policy - LIC नवनवीन पाॅलिसी घेऊन येत असते. जाणून घेऊ अशाच एका फायदेशीर पाॅलिसीबद्दल

  • Share this:

मुंबई, 20 जुलै : आपल्या मुलांचं भविष्य चांगलं असावं, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. त्यासाठीच भारतीय जीवन विमा निगम ( LIC ) ची एक योजना आहे. जी मुलांच्या गरजा लक्षात घेऊन तयार केलीय. ही योजना आहे न्यू चिल्ड्रन्स मनी बॅक प्लॅन. LIC नं चिल्ड्रन्स डेच्या दिवशी ही योजना लाँच केली होती.

जाणून घेऊ या पाॅलिसीबद्दल

पाॅलिसीची वैशिष्ट्य

ही पाॅलिसी घेण्याचं कमीत कमी वय 0 आहे.

विमा घेण्याचं जास्तीत जास्त वय आहे 12 वर्ष

कमीत कमी विमा रक्कम 1,00,00 रुपये

जास्तीत जास्त विमा रकमेवर काही सीमा नाही

प्रीमियर वेवर बेनिफिट रायडर ऑप्शन उपलब्ध

एअर इंडियात नोकरीची मोठी संधी, 335 जागांवर होतेय भरती

मनी बँक इन्स्टाॅलमेन्ट

पाॅलिसीधारकाला 18,20 आणि 22 वर्षानंतर सम अॅश्योर्डची 20 टक्के रक्कम मिळेल.

मॅच्युरिटी फायदा

पाॅलिसी मॅच्युरिटीच्या वेळी पाॅलिसीधारकाला विमा राशीचा 40 टक्के बोनस मिळेल.

1 लाख रुपयांमध्ये सुरू करा हा व्यवसाय, दर महिन्याला कमवा 15 हजार रुपये

डेथ फायदा

पाॅलिसीच्या काळात विमाधारकाचा मृत्यू झाला तर नाॅमिनीला विमा रकमेसोबत रिव्हर्शनरी बोनस आणि अतिरिक्त बोनस मिळेल. डेथ बेनिफिट प्रीमियम रकमेच्या 105 टक्क्यांहून कमी असणार नाही.

दरम्यान देशातल्या विमा कंपन्यांकडे 16887.66 कोटी रुपये बेवारस पडलेत. सप्टेंबर 2018पर्यंतची ही आकडेवारी आहे. भारतीय विमा नियामक म्हणजेच विकास प्राधिकरणा ( IRDAI )नं विमा कंपन्यांना विमाधारकांची ओळख करून घ्यायला सांगितलंय. त्यांचे पैसे परत करायचे आदेशही  दिलेत. 

मोदी सरकारचं नवं विधेयक, बँकेच्या 'या' व्यवहारासाठी वाढणार टॅक्स

या रकमेचं काय होतं?

IRDAI नं एक पत्रक जारी केलं होतं. यात सर्व विमा कंपन्यांना आदेश दिले होते की , 30 सप्टेंबर 2017 पर्यंत 10 वर्षांपेक्षा जास्त काळात पाॅलिसीधारकांनी दावा न केलेली रक्कम वरिष्ठ नागरिक कल्याण कोषात भरावी. हे काम मार्च 2018पर्यंत करायचे आदेश होते.

पैसे का पडून राहतात?

याला अनेक कारणं आहेत. अनेकदा विमाधारकाच्या नाॅमिनीला हे माहीतच नसतं. विमा डाॅक्युमेंट्स मिळत नाहीत. म्हणूनच विमाधारकांनं नाॅमिनीला विम्याची माहिती तर द्यावीच. पण कागदपत्रं कुठे ठेवलीयत, तेही सांगावं.

चेक पेमेंटनं जास्त वेळ जातो. म्हणून हल्ली बऱ्याच कंपन्यांनी इलेक्ट्राॅनिक व्यवस्था सुरू केलीय. 2014 नंतरच्या विमा पाॅलिसीमध्ये विमा कंपन्या इलेक्ट्राॅनिक ट्रान्सफरवर जोर देतात.

VIDEO: मृत्यू जवळ येत होता आणि हे आजोबा जीव मुठीत धरून बसले होते

First published: July 20, 2019, 12:26 PM IST
Tags: LIC

ताज्या बातम्या