मुंबई, 3 फेब्रुवारी: तुम्ही देखील LIC पॉलिसीधारकांपैकी एक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. आता LIC ने व्हॉट्सअॅप सेवा सुरू केली आहे. विमा कंपनीच्या या सुविधेमुळे, पॉलिसीधारकांना एलआयसी कार्यालयात जाण्याची गरज नाही. कारण त्यांची सर्व कामे व्हॉट्सअॅपद्वारे केली जातील. यामुळे आता एलआयसी पॉलिसीधारकांना काही विशेष सेवांचा फायदा होणारेय. ज्या पॉलिसीधारकांनी आपली पॉलिसी एलआयसी पोर्टलवर नोंदणी केली आहे त्यांना ही सुविधा उपलब्ध असेल
यासोबतच ज्या एलआयसी पॉलिसीधारकांनी आपली पॉलिसी ऑनलाइन रजिस्टर केली नाही. त्यांनी सर्वात आधी व्हॉट्सअॅप सेवेचा लाभ घेण्यासाठी एलआयसीच्या अधिकृत साइटला भेट देऊन पॉलिसीची नोंदणी करुन घ्यावी. तुम्हाला तुमच्या एलआयसीकडे नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवावा लागेल. 8976862090 या मोबाईल क्रमांकावर “Hi” पाठवून ग्राहकांना पॉलिसी सेवांशी संबंधित माहिती घरबसल्या मिळू शकते.
अर्जंट कॅश हवीये पण ATM कार्ड जवळ नाही? या सीक्रेट ट्रिकने एका झटक्यात होईल काम
-सर्वप्रथम हा 8976862090 नंबर तुमच्या मोबाईल फोनमध्ये सेव्ह करा.
-हा LIC चा अधिकृत WhatsApp नंबर आहे.
-फोनमध्ये नंबर सेव्ह केल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअॅप ओपन करावे लागेल.
-यानंतर व्हॉट्सअॅपमध्ये या नंबरसोबत चॅट बॉक्स उघडावा लागेल.
-चॅट बॉक्स उघडल्यानंतर तुम्हाला Hi लिहून पाठवावे लागेल.
-तुम्ही Hi लिहून पाठवताच तुम्हाला LIC च्या चॅट बॉक्समध्ये 11 ऑप्शन्स मिळतील.
-तुम्हाला फक्त या ऑप्शन्समधून ज्या सर्विसबद्दल माहिती हवी आहे.
-त्यापुढे दिसणारा ऑप्शन नंबर लिहून पाठवावा लागेल.
LIC ची विमाधारकांना खास ऑफर, अशी सुरु करता येणार बंद पडलेली पॉलिसी !
-प्रीमियम ड्यू
-बोनसविषयी माहिती
-पॉलिसी स्टेटस
-लोन एलिजिबिलिटी क्वोटेशन
-लोन रिपेमेंट क्वोटेशन
-लोन इंटरेस्ट ड्यू
-प्रीमियम पेड सर्टिफिकेट
-ULIP यूनिट्स का स्टेटमेंट
-LIC सर्विस लिंक्स
-Opt In/Opt Out सर्विसेज
-End Conversation
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.