मराठी बातम्या /बातम्या /मनी /LIC कडून कोट्यवधी ग्राहकांना महत्त्वाचा SMS; काय आहे मेसेजमध्ये?

LIC कडून कोट्यवधी ग्राहकांना महत्त्वाचा SMS; काय आहे मेसेजमध्ये?

सध्या बँकिंग आणि ऑनलाईन व्यवहारांसाठी अनेक कागदपत्रे मोठ्या प्रमाणावर पॅन कार्डाशी लिंक केली जात आहेत. आता एलआयसीने देखील पॅन लिंक करण्यास सांगितले आहे.

सध्या बँकिंग आणि ऑनलाईन व्यवहारांसाठी अनेक कागदपत्रे मोठ्या प्रमाणावर पॅन कार्डाशी लिंक केली जात आहेत. आता एलआयसीने देखील पॅन लिंक करण्यास सांगितले आहे.

सध्या बँकिंग आणि ऑनलाईन व्यवहारांसाठी अनेक कागदपत्रे मोठ्या प्रमाणावर पॅन कार्डाशी लिंक केली जात आहेत. आता एलआयसीने देखील पॅन लिंक करण्यास सांगितले आहे.

मुंबई, 20 ऑक्टोबर : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी (Insurance Company) लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (LIC) आपल्या कोट्यवधी पॉलिसीधारकांना एक SMS पाठवला आहे. एलआयसीने ग्राहकांना पाठवलेल्या मेसेजमध्ये म्हटले आहे की पीएमएलनुसार 50 हजारांहून जास्त रोख पेमेंटसाठी पॅन आवश्यक आहे. त्यामुळे एलआयसी पॉलिसीधारकांनी तातडीने त्यांच्या एलआयसी पॉलिसीला पॅन कार्डशी लिंक करणे अनिवार्य आहे.

सध्या बँकिंग आणि ऑनलाईन व्यवहारांसाठी अनेक कागदपत्रे मोठ्या प्रमाणावर पॅन कार्डाशी लिंक केली जात आहेत. आता एलआयसीने देखील पॅन लिंक करण्यास सांगितले आहे. एलआयसी म्हणते की पॅनला पॉलिसीशी जोडण्याचे अनेक फायदे आहेत. तसेच पॅन लिंक कसं करायचं असा प्रश्न पडला असेल तर काळजीचं कारण नाही, कारण पॅन पॉलिसीशी जोडण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे.

LIC पॉलिसीधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, अशाप्रकारे अपडेट करा तुमचे डिटेल्स; मोबाइलवर मिळेल सर्व माहिती

पॅन पॉलिसीशी लिंक कशी करायची?

पॅन पॉलिसीशी जोडण्यासाठी ग्राहकांना www.licindia.in या वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल. एलआयसीने यासाठी 3 टप्पे दिले आहेत, ज्याच्या मदतीने एलआयसी पॉलिसी पॅनशी लिंक करणे खूप सोपे आहे.

1- एलआयसी वेबसाइटवर पॉलिसींच्या सूचीसह पॅन तपशील भरा. तुमचा मोबाईल क्रमांक नोंद करा.

2- तुमच्या मोबाइल क्रमांकावर LIC कडून एक OTP येईल. तो तिथे एंटर करा.

3- फॉर्म सबमिट केल्यावर, तुम्हाला रजिस्ट्रेशन सक्सेसफुलचा मेसेज येईल. अशारीतीने तुमचे पॅन LIC पॉलिसीशी लिंक होते.

Alert! ITR Filing सह ही 4 कामं 31 ऑक्टोबरपूर्वीच करा पूर्ण, अन्यथा होईल मोठं नुकसान

एलआयसी पॉलिसीचे स्टेटस ऑनलाईन तपासण्यासाठी काय कराल?

  • एलआयसी पॉलिसीचे ऑनलाइन स्टेटस जाणून घेण्यासाठी तुम्हाला आधी https://www.licindia.in/ या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. स्टेटस जाणून घेण्यासाठी तुम्हाला येथे नोंदणी करावी लागेल.
  • नोंदणीसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही. यासाठी तुम्हाला तुमची जन्मतारीख, नाव, पॉलिसी क्रमांक टाकावा लागेल. एकदा नोंदणी केल्यानंतर, तुम्ही कधीही स्टेटस तपासू शकता.
  • तुम्हाला काही पॉलिसीसंदर्भात माहिती हवी असल्यास तुम्ही 022 6827 6827 वर देखील कॉल करू शकता. या व्यतिरिक्त, तुम्ही 9222492224 या क्रमांकावर LICHELP <policy number> लिहून संदेश पाठवू शकता. यामध्ये मेसेज पाठवण्यासाठी तुमचे पैसे कापले जाणार नाहीत.

First published:
top videos

    Tags: Insurance, Investment, LIC, Money