LIC पॉलिसीधारकांनो सावधान! एका फोन कॉलमुळे होऊ शकतं मोठं नुकसान

LIC पॉलिसीधारकांनो सावधान! एका फोन कॉलमुळे होऊ शकतं मोठं नुकसान

बचतीसाठी LIC पॉलिसी काढणं हा सगळ्यात सुरक्षित मार्ग समजला जातो. पण LIC चं नाव वापरून लोकांची फसवणूक करण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर : बचतीसाठी LIC पॉलिसी काढणं हा सगळ्यात सुरक्षित मार्ग समजला जातो. पण LIC चं नाव वापरून लोकांची फसवणूक करण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. त्यामुळेच LIC ने आपल्या वेबसाइटवर याची माहिती देऊन पॉलिसीधारकांना सतर्क केलं आहे.

LIC च्या पॉलिसीची रक्कम लगेच देतो, असं सांगून फोन कॉलवर फसवणूक केली जातेय.

या फोन कॉलपासून सावध राहा.

1. तुम्हाला कुणी LIC चा एजंट, IRDAI अधिकारी, ECI अधिकारी या नावाने फोन करत असेल तर सावध राहा. LIC ने कुणालाही पॉलिसीचे फायदे किंवा नुकसान सांगण्यासाठी फोन केलेला नाही.

2. LIC बोनसची माहिती कुणाशीही शेअर करत नाही.

3. LIC कधीही विमाधारकांना पॉलिसी सुरू न ठेवण्याबद्दल सांगत नाही.

(हेही वाचा : इनकम टॅक्सचा हा नियम बदलणार, तुमच्यावर होणार थेट परिणाम)

4. कोणत्याही पॉलिसीची माहिती योग्य आहे की नाही हे पाहण्यासाठी LIC ची वेबसाइट www.licindia.in यावरून माहिती घ्या किंवा जवळच्या LIC ब्रँचमध्ये संपर्क साधा.

5. LIC च्या पॉलिसीबद्दल माहिती घेण्यासाठी या वेबसाइटवर जा.. https://www.licindia.in/getattachment/Customer-Services/Costumer-Education/Spurious-calls_161017.pdf.aspx

6. फसवणूक करणारे कॉल आले तर त्याबद्दल पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल करा.

==================================================================================================

Published by: Arti Kulkarni
First published: November 13, 2019, 8:07 PM IST

ताज्या बातम्या