मराठी बातम्या /बातम्या /मनी /

एलआसीच्या 'या' योजनेत एकदा प्रीमियम भरा आणि आयुष्यभर पेन्शन मिळवा, तुम्हाला माहित आहे का योजना?

एलआसीच्या 'या' योजनेत एकदा प्रीमियम भरा आणि आयुष्यभर पेन्शन मिळवा, तुम्हाला माहित आहे का योजना?

LIC ने लोकांच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन 1 जुलै 2021 रोजी सरल पेन्शन योजना सुरू केली. या पॉलिसीची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्ही फक्त एकदाच प्रीमियम भरून दर महिन्याला निश्चित उत्पन्न मिळवू शकता.

    मुंबई, 31 जुलै : विमा योजना घेण्याचा विचार करत असाल अनेक अनेक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. मात्र तुम्ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC ची योजना घेण्याचा विचार करत असाल तर LIC सरल पेन्शन योजना तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकते. ही एक नॉन-लिंक केलेली, सिंगल प्रीमियम, वैयक्तिक तत्काळ वार्षिकी योजना आहे. हा प्लॅन जोडीदारासोबतही घेता येईल. LIC ने लोकांच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन 1 जुलै 2021 रोजी सरल पेन्शन योजना सुरू केली. या पॉलिसीची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्ही फक्त एकदाच प्रीमियम भरून दर महिन्याला निश्चित उत्पन्न मिळवू शकता. या योजनेअंतर्गत, तुम्ही पॉलिसी सुरू झाल्याच्या तारखेपासून सहा महिन्यांनंतर कधीही कर्ज घेऊ शकाल. तुम्ही ही पॉलिसी ऑनलाइन आणि ऑफलाइन खरेदी करू शकता. रेल्वेमध्ये लांबच्या प्रवासात विंडो सीटवर बसण्याचा अधिकार कुणाला असतो? नियम काय सांगतो तपासा या योजनेत कमीत कमी दर वर्षाला 12,000 रुपयांची गुंतवणूक करता येते. या योजनेत कमाल गुंतवणूकीची कसलीही मर्यादा देण्यात आलेली नाही. या योजनेतच तुम्हाला महिन्याला, तिमाही, सहामाही अथवा वार्षिक अशाप्रकारे निवृत्तीवेतन घेता येते. सोबतच या पॉलिसीतंर्गत तुम्हाला कर्ज सुविधा ही घेता येते. सरल पेन्शन योजनेतंर्गत पॉलिसीधारकाला सहा महिन्यानंतर कर्ज सुविधी उपलब्ध होते. योजनेत दोन पर्याय आहेत. एकतर पॉलिसी कोणाच्याही नावावर असेल, म्हणजेच ही पेन्शन योजना कोणत्याही एका व्यक्तीशी जोडली जाईल. जोपर्यंत पेन्शनधारक जिवंत आहेत, तोपर्यंत त्यांना पेन्शन मिळत राहील. त्यानंतर नॉमिनीला बेस प्रीमियम मिळेल. दुसरं म्हणजे  या प्लॅनमध्ये पती आणि पत्नी दोघांनाही कव्हरेज आहे. यामध्ये जो दीर्घकाळ जगतो, त्याला पेन्शन मिळते. जेव्हा दोघेही नसतील तेव्हा नॉमिनीला मूळ किंमत मिळेल. ITR Filing: इनकम टॅक भरण्याचा आज शेवटचा दिवस; डेडलाईन चुकल्यास जेलमध्येही जावं लागू शकतं योजनेची वैशिष्ट्य काय आहे? या योजनेअंतर्गत तुम्हाला मासिक पेन्शनचा लाभ घ्यायचा असेल तर दरमहा किमान 1 हजार रुपये जमा करावे लागतील. त्याचप्रमाणे तिमाही पेन्शनसाठी एका महिन्यात किमान 3000 गुंतवावे लागतील. एलआयसीच्या या योजनेंतर्गत, पॉलिसीधारकाला एकरकमी रक्कम भरल्यावर दोन उपलब्ध पर्यायांमधून वार्षिकी निवडण्याचा पर्याय आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, LIC, Money

    पुढील बातम्या