LIC ची सर्वोत्तम पाॅलिसी, रोज फक्त 9 रुपये खर्च आणि लाखोंचा फायदा

LIC ची सर्वोत्तम पाॅलिसी, रोज फक्त 9 रुपये खर्च आणि लाखोंचा फायदा

LIC, New Jeevan Anand Policy - LIC च्या न्यू जीवन आनंद पाॅलिसीमध्ये विमाधारकाला खूप फायदा आहे. जाणून घ्या त्याबद्दल

  • Share this:

मुंबई, 25 जुलै : देशाची सर्वात मोठी विमा कंपनी LICकडे अनेक फायदेशीर स्कीम्स आहेत. त्यात जास्त फायदेशीर आहे न्यू जीवन आनंद पाॅलिसी. तज्ज्ञांच्या मते यात पाॅलिसीधारकाला दुप्पट फायदा मिळतो. यात पैसे गुंतवले की तुमचा इन्कम टॅक्स वाचतो. दुसरं म्हणजे पाॅलिसी रिस्क कव्हर आयुष्यभर राहतं. पाॅलिसी अवधी संपल्यानंतर पाॅलिसीधारकाचा मृत्यू झाला तरीही त्या पाॅलिसीचा फायदा नाॅमिनीला होतो.

पाॅलिसीवर मिळतील 2 फायदे - समजा 18व्या वर्षी तुम्ही ही पाॅलिसी घेतलीत आणि 1 लाख रुपयांची पाॅलिसी 35 वर्षांसाठी घेतलीत तर दर वर्षी तुम्हाला प्रीमियम 1,07,645 रुपये द्यावा लागणार. मॅच्युरिटीनंतर पाॅलिसीधारकाला 4.56 लाख रुपये मिळतील.

खूशखबर! 12 दिवसांनी झालं डिझेल स्वस्त, पेट्रोलच्या दरातही घसरण

काय आहे ही योजना? -  तुमचं वय 18 वर्षांचं असेल, तर LICची ही योजना तुमच्यासाठी फायदेशीर असेल. या योजनेसाठी तुमचं वय 50 वर्षांपेक्षा जास्त नको.

गुंतवायची रक्कम - या योजनेसाठी कमीत कमी 1 लाख रुपयांची विमा रक्कम घ्यावी लागते. जास्तीत जास्त कितीही घेऊ शकता.

इंजिनियर्ससाठी सरकारी नोकरीत मोठी भरती, 'असा' करा अर्ज

पाॅलिसीचा काळ - न्यू जीवन आनंद प्लॅनची पाॅलिसी 15 ते 35 वर्षांपर्यंत आहे. LIC ची न्यू जीवन आनंद पाॅलिसी तुम्ही आॅनलाइनबरोबर आॅफलाइनही घेऊ शकता.

प्रीमियम - पाॅलिसीसाठी वर्ष, सहा महिने, तीन महिने आणि महिना असा प्रीमियम तुम्ही भरू शकता. याची खासीयत अशी की तीन वर्षानंतर तुम्ही पाॅलिसीवर कर्जही घेऊ शकता.

मॅच्युरिटीवर मिळेल फायदा - विमा राशीबरोबर साधा रिव्हर्सरी बोनस आणि अंतिम अॅडिशनल बोनस.

मॅच्युरिटीवर मृत्यू झाला - नाॅमिनीला विमा रक्कम 5 लाख रुपये मिळतील.

या पाॅलिसीच्या मध्ये मृत्यू झाला तर नाॅमिनीला विमा रक्कम मिळेल, ती विमा रकमेच्या 125 टक्के असेल. याबरोबर बोनस आणि अंतिम बोनसही मिळेल.

सोनं पुन्हा एकदा कडाडलं, 'हे' आहेत बुधवारचे 10 ग्रॅमचे दर

कर सवलत - 80C प्रमाणे या पाॅलिसीमुळे करात सूट मिळेल. मॅच्युरिटी किंवा मृत्यूनंतर मिळणाऱ्या पैशावरही कर बसणार नाही.

ऑन ड्युटी टिक टॉक VIDEO करणं महिला पोलिसांच्या अंगलट, निष्काळजीपणा भोवला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: LIC
First Published: Jul 25, 2019 11:52 AM IST

ताज्या बातम्या