नवी दिल्ली, 23 मे : सरकारने 60 आणि त्याहून अधिक वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी पंतप्रधान वय वंदन योजना (PMVVY) सुरू केली आहे. LIC च्या वेबसाईटवरुन ही योजना ऑनलाईन खरेदी करता येऊ शकते. हा एक Immediate pension plan आहे, जो ऑनलाईन खरेदी करता येईल. याद्वारे 10 वर्षांच्या पॉलिसी मुदतीसाठी पेन्शन दिलं जातं. विशेष बाब म्हणजे, या स्किममधील पैसे (purchase price) 10 वर्षांनंतर परत दिले जातात.
PMVVY योजनेत 15 लाख रुपयांच्या गुंतवणूकीवर ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 9250 रुपये इतकं पेन्शन दिलं जातं. एवढंच नाही, तर 10 वर्ष पूर्ण झाल्यानंतर योजनेत गुंतवलेले संपूर्ण पैसे 15 लाख रुपये परत केले जातात.
पेन्शन मोड (Pension modes) -
पंतप्रधान वय वंदन योजनेमध्ये (PMVVY) एक महिना, तीन महिने आणि वार्षिक अशा मोडमध्ये पेन्शनची सुविधा दिली जाते. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना निवडलेल्या पर्यायानुसार पेन्शन दिलं जातं. जर एखाद्या व्यक्तीने मासिक मोड सिलेक्ट केला असेल, तर त्यांना योजनेत गुंतवणूक केल्याच्या पुढील महिन्यापासून पेन्शन सुरू होतं. ज्येष्ठ नागरिक यासाठी 31 जानेवारी 2023 पर्यंत सब्सक्राईब करू शकतात. या योजनेचा फायदा केवळ भारतात राहणारे नागरिकच (Indian resident) घेऊ शकतात.
मेडिकल चाचणी आणि लोन (Medical examination & Loan facility) -
PMVVY योजनेसाठी कोणत्याही मेडिकल चाचणीची आवश्यकता नाही. तसंच या योजनेत गुंतवणूक केल्यापासून, तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर लोन घेण्याची सुविधाही मिळते. यात गुंतवलेल्या रकमेच्या 75 टक्के लोन दिलं जातं.
या योजनेत 1000 रुपयांच्या मासिक पेन्शनसाठी 1,62,162 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. तर 15 लाखांच्या गुंतवणुकीवर 10 वर्षांपर्यंत 9250 रुपये मासिक पेन्शन मिळेल. तसंच 10 वर्षांनंतर पूर्ण रक्कमही मिळेल. या योजनेत पेन्शन प्लॅनसाठी अनेक पर्याय आहेत, परंतु एकदा एक पर्याय निवडल्यानंतर, तो बदलता येऊ शकत नाही. एलआयसीच्या वेबसाईटवर ही योजना ऑनलाईन घेता येऊ शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: LIC, Pension scheme