90 दिवसाचं मूल ते 65 वर्षाच्या व्यक्तीसाठी आहे ही LIC पाॅलिसी, महत्त्वाची 5 वैशिष्ट्य

90 दिवसाचं मूल ते 65 वर्षाच्या व्यक्तीसाठी आहे ही LIC पाॅलिसी, महत्त्वाची 5 वैशिष्ट्य

LIC, Navjeevan Policy - एलआयसीच्या या पाॅलिसीत बरेच फायदे आहेत. जाणून घ्या त्याबद्दल -

  • Share this:

मुंबई, 27 जुलै : LIC नं काही दिवसांपूर्वी नवजीवन पाॅलिसी लाँच केली होती. ही योजना नॉन लिंक्ड पार्टिसिपेटिंग एंडोमेंट जीवन योजना आहे. या योजनेचा नंबर 853 आहे. या योजनेची सरंक्षण आणि बचत अशी दोन वैशिष्ट्य आहेत. या योजनेत 5 वर्षापर्यंत प्रीमियम भरू शकतो. हा प्लॅन 90 दिवसांच्या छोट्या मुलापासून ते 65 वर्षापर्यंतच्या व्यक्तीसाठी उपलब्ध आहे. यात 45 वर्षांनंतर सम एश्योर्ड निवडण्याचा पर्याय असतो. जाणून घेऊ तिची 5 वैशिष्ट्य.

अशी घ्या योजना- LIC ची नवजीवन योजना ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा दोन्ही पद्धतीने घेऊ शकतो. ही योजना आपण LIC विक्रेत्याकडून तसेच LIC च्या https://eterm.licindia.in/onlinePlansIndex/login.do या वेबसाइट वरून आपण घेऊ शकतो.या नव्या योजनेत ग्राहकाला सिंगल प्रीमियम पेमेंटची सुविधा देण्यात आली आहे. याबरोबरच पाच वर्षांपर्यंत प्रीमियम आपण भरू शकणार आहोत.

वयोमर्यादा- ही योजना तीन वर्षांच्या लहान मुलापासून ते 65 वर्षांच्या ज्येष्ठांसाठी आहे. यात 45 वर्षांनंतर रिस्क सम एश्योर्ड घेण्याचा पर्याय दिला आहे.

अकोल्यात अकाउंटंट, क्लार्क पदांवर भरती, 73 जागांवर व्हेकन्सी

किती पैसे भरायचे? - या योजनेत कमीतकमी 1 लाख रूपयाचा विमा असेल. कमाल विमा घेण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही. जर एखाद्याचे वय 45 वर्षांपेक्षा जास्त असेल तर त्याला लिमिटेड प्रीमियममध्ये दोन पर्याय दिले आहेत. प्रथम पर्यायात वार्षिक प्रीमियमचा 10 पटीनीं सम एश्योर्ड तर दुसऱ्या पर्यायात वार्षिक प्रीमियमचा 7 पटीनीं सम एश्योर्ड चा पर्याय आपल्याला दिला आहे.

खूशखबर, सोन्या-चांदीच्या दरात घसरण, 'हे' आहेत शुक्रवारचे भाव

कालावधी - या योजनेचा काळ 10 ते 18 वर्षे असेल. आपण सिंगल प्रीमियम योजनेला जास्तीतजास्त 44 वयोवर्षांपर्यंत तर लिमिटेड योजना 60 वयोवर्षांपर्यंत आपण घेऊ शकतो. या योजनेत सिंगल प्रीमियम प्लॅन म्यॅच्युरिटी जास्तीत जास्त 62 वयोवर्षांपर्यंत मिळेल तर लिमिटेड विमा योजनेचा प्लॅन 75 वयोवर्षांपर्यंत आहे.

रेल्वेची नवी सेवा, फिंगर प्रिंटवरून 'असं' बुक होईल ट्रेनचं तिकीट

करबचत- LIC च्या या नव्या विमा योजनेत आपण करबचत करू शकतो. याबरोबरच आपण कर्जही काढू शकतो.

महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांच्या बाचावकार्यासाठी 2 हेलिकॉप्टर्स घटनास्थळी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: LIC
First Published: Jul 27, 2019 11:22 AM IST

ताज्या बातम्या